Sambhajinagar News : एटीएम फोडणारे दोन सराईत पोलिसांच्या ताब्यात; गाडीसह एटीएम मशीन आणि मोबाईल जप्त

Sambhajinagar News : एटीएम मशीनमधील पैसे लांबविण्याच्या ऐवजी थेट मशीन गाडीत टाकून लांबविल्याची घटना संभाजीनगर जिल्ह्याती वैजापूर तालुक्यातमधील शिऊर बांगला पोलीस स्टेशन हद्दीत घडला होता
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या शिऊर बंगला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएम फोडण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत एटीएम फोडून गाडीत घेऊन जात असताना नागरिकांनी त्यांचा पाठलाग करत पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.  

Sambhajinagar News
Sambhajinagar Bribe Case : १ लाखाची लाच घेताना महावितरणचा अधिकारी जाळ्यात; कामांचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेकेदाराकडून घेतली लाच

एटीएम (ATM) मशीनमधील पैसे लांबविण्याच्या ऐवजी थेट मशीन गाडीत टाकून लांबविल्याची घटना संभाजीनगर जिल्ह्याती वैजापूर तालुक्यातमधील शिऊर बांगला पोलीस स्टेशन हद्दीत घडला होता. एटीएम मशीन हे सटाणा रोडवर मालेगाव- सटाणा महामार्गावर फोडून ते छत्रपती संभाजीनगरच्या (Sambhajinagar news) दिशेने रवाना झाले होते. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांचा पाठलाग सुरु केला. नागरिकांनी पाठलाग करत या चोरट्याने पकडण्यात यश आले. नागरिकांनी त्यांना चांगलाच चोप दिला. 

Sambhajinagar News
Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मुक्काम यंदा नव्या मंदिरात; देहू संस्थांकडून उभारण्यात आले नवे मंदिर

दरम्यान नागरिकांनी चोरट्याना पकडून शिऊर पोलिसांच्या (Police) स्वाधीन केले. यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून एटीएम मशीनसह दोन मोबाईल, कटर आणि एक चारचाकी गाडी असा ऐवज जप्त केला. दरम्यान यावेळी पकडलेल्या चोरांना गावातल्या नागरिकांनीही चांगलाच चोप दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com