Sambhajinagar Bribe Case : १ लाखाची लाच घेताना महावितरणचा अधिकारी जाळ्यात; कामांचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेकेदाराकडून घेतली लाच

Sambhajinagar News : महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळांतर्गत असलेल्या कन्नड विभागातील कार्यकारी अभियंता धनाजी रामगुडे व उपव्यवस्थापक प्रवीण दिवेकर याना एलसीबीने ताब्यात घेतले
Sambhajinagar Bribe Case
Sambhajinagar Bribe CaseSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : महावितरणकडून काढण्यात आलेल्या कामांमधील रोहित्राच्या चार कामांचा प्रस्ताव मंजूरकरून देण्यासाठी ठेकेदाराकडून १ लाख रुपयांची लाच घेण्यात आली. ही रक्कम स्वीकारताना कन्नडच्या महावितरण विभागाचा कार्यकारी अभियंता धनाजी रामगुडे आणि उपव्यवस्थापक प्रवीण दिवेकर या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. 

Sambhajinagar Bribe Case
Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मुक्काम यंदा नव्या मंदिरात; देहू संस्थांकडून उभारण्यात आले नवे मंदिर

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) परिमंडळांतर्गत असलेल्या कन्नड विभागातील कार्यकारी अभियंता धनाजी रामगुडे व उपव्यवस्थापक प्रवीण दिवेकर याना एलसीबीने ताब्यात घेतले आहे. संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोघांनी साडेतीन लाखांची मागणी केली. (Mahavitaran) दीड लाख मिळाल्यानंतर दोन कामांचे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी मंजुरीसाठी पाठवले. मात्र उर्वरित दोन कामांसाठी पुन्हा दोन लाखांची मांगणी केली. यामुळे तक्रारदाराने याबाबत एलसीबीकडे तक्रार दाखल केली. याची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.  

Sambhajinagar Bribe Case
Soyabean Price Update: बाजार समितीत आवक वाढली; मात्र हमीभावापेक्षाही कमी दराने सोयाबीन खरेदी

दरम्यान तडजोडीअंती १ लाख रुपये घेण्यास तयार झाल्यानंतर ठेकेदाराला दालनातच पैसे घेऊन येण्यास सांगितले. मात्र तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार (ACB) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रामुगडेच्या दालनातच सापळा रचला. १ लाखाची रक्कम स्वीकारताच दोघांना अटक केली. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com