मनोज जयस्वाल
वाशिम : रब्बी हंगामात काढणी केलेला सोयाबीन चांगला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी त्याची घरात साठवणूक करून ठेवली होती. दरम्यान आता चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन मार्केटमध्ये विक्रीसाठी आणायला सुरवात केली आहे. मात्र बाजार समितीमध्ये आवक वाढत असली तरी येथे शेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर दिला जात आहे.
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी आटोपती घेतली असून पावसातील सातत्य आणि अनुकूल वातावरणामुळे पिकाची वाढही जोमाने होत आहे. दुसरीकडे बाजार समित्यांमध्ये आजही सोयाबीनची आवक वाढती असून क्विंटलमागे भाव (Soyabean Price) मात्र घसरतेच आहेत. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल ४ हजार ४०० रुपये दर मिळाला. तर अन्य (Bajar Samiti) बाजार समित्यांमध्ये हे दर ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल राहिले. इतरही शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
वाशिम (Washim) जिल्ह्यात सध्या सोयाबीनला केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव पेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव ४ हजार ६०० रुपये आहे. मागील दोन वर्षापासून सोयाबीनचे दर सतत कमी मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांकडे अद्यापही सोयाबीन विक्री विना पडून आहे. या दरात सातत्याने घसरण होत असल्याने वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.