Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Water Scarcity : ४५ दिवसांपासून पाण्याची समस्या; हंडा घेऊन महिलांचा रास्ता रोको

Nashik News : यंदा पावसाळा कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे अनेक भागात पाणी टंचाईची समस्या आतापासून जाणवायला लागली आहे.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : पाणी टंचाईची समस्या आता ग्रामीण भागासह शहरी भागात देखील जाणवण्यास सुरवात झाली आहे. या दरम्यान (Nashik) नाशिकच्या नांदगाव शहरात पाणी टंचाई (Water Scarcity) झळा बसत असून मागील ४५ दिवसांपासून पाणी पुरवठ्याची समस्या असल्याने संतप्त महिलांनी आज हंडा मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले. (Breaking Marathi News)

यंदा पावसाळा कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे अनेक भागात पाणी टंचाईची समस्या आतापासून जाणवायला लागली आहे. त्यानुसार नाशिकच्या नांदगाव शहरातील मल्हारवाडी व परिसरात (Nandgaon) गेल्या ४५ दिवसांपासून नागरीकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या भागाला पाणी पुरवठा माणिकपुंज धरण, गिरणा धरण यातून पाणी पुरवठा होतो. मात्र कधी पाईप लाईन फुटणे, पाईप लाईन दुरुस्ती यामुळे या परिसरातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदगाव- येवला मार्गावर रास्तारोको 

मागील दीड महिन्यापासून येत असलेल्या समस्येने त्रस्त व संतप्त महिलांनी पाण्याचे हंडे घेत नांदगाव- येवला रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलिस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने २१ फेब्रुवारीला संध्याकाळपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT