म्हाडा नाशिक मंडळाने 478 परवडणारी घरे विक्रीसाठी उपलब्ध केली.
ही घरे 15.51 लाख ते 27.10 लाख रुपयांत उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 ऑक्टोबर 2025 रात्री 11.59 पर्यंत आहे.
अर्ज प्रक्रिया म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू आहे.
घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकांचं असतं. हक्काच्या घरासाठी आपली धडपड सुरूच असते. मात्र, प्राईम लोकेशनवर घर घेणं सामान्यांच्या खिशाला परवडत नाही. पण सामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण म्हाडा करतं. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून नुकतेच घरांची सोडत निघाली. आता पुणे आणि नाशिकमध्येही लॉटरी निघणार आहे. तब्बल ४७८ परवडणारी घरे विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार असून, अवघ्या १५ लाखांत घरे मिळणार आहेत. दरम्यान, ही घरे सामान्यांच्या खिशाला नक्कीच परवडणारी ठरेल.
म्हाडाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत तब्बल ४७८ परवडणारी घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. ही घरे गंगापूर, देवळाली, पाथर्डी, म्हसरूळ, नाशिक आणि आगर टाकळी या भागात बांधण्यात आली आहेत.
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते ४ सप्टेंबर रोजी नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेची औपचारिक सुरूवात करण्यात आली आहे. इच्छुकांना ४ ऑक्टोबर २०२५ तारखेपर्यंत अनामत रकमेसह अर्ज दाखल करता येईल. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ ऑक्टोबरच्या रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.
परवडणाऱ्या दरात घ्या हक्काचं घर
नाशिक विभागातील म्हाडाच्या घरांची किंमत १५ लाखांपासून सुरू होते. या घरांच्या किंमती १५.५१ लाख ते २७.१० लाख इतक्या आहेत. यामुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घर घेण्याची संधी मिळणार आहे. नाशिक म्हाडा मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध करण्यात आली आहेत.
अर्जांची प्राथमिक छाननी करून १७ ऑक्टोबर रोजी पात्र अर्जदारांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. मात्र, सोडतीचा अंतिम निकाल कुठे आणि केव्हा जाहीर होईल, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.