Malegaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Malegaon Crime : मालेगावमध्ये भर रस्त्यात थरार; गाडी अडवत व्यापाऱ्याचे २५ लाख रुपये घेऊन पसार

Malegaon Nashik News : किराणा व्यावसायिक मनोज चांदमल मुथा हे रात्रीच्या सुमारास आपले किराणा दुकान बंद करुन दुकानातील रक्कम घेऊन रात्री घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्यावर काही जणांची नजर होती

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
मालेगाव (नाशिक)
: मालेगाव शहराजवळ मुंबई- आग्रा महामार्ग धुळे बायपास रोडवर रात्रीच्या सुमारास अज्ञात सहा जणांनी दोन दुचाकीवर हत्यारांसह येत एका व्यापाऱ्याला २५ लाखांना लूटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारच्या मागून येत मागील काच फोडून गाडी अडवत हि लुटमारी करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

नाशिकच्या मालेगाव शहरातील मुंबई- आग्रा महामार्गावर टेहरे गावाजवळ सदरची घटना रात्रीच्या सुमारास घडली. किराणा व्यावसायिक मनोज चांदमल मुथा हे रात्रीच्या सुमारास आपले किराणा दुकान बंद करुन दुकानातील रक्कम घेऊन रात्री घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्यावर काही जणांची नजर होती. त्यानुसार कारच्या मागे दुचाकी लागत पाठलाग करून संधी मिळताच या अज्ञातांनी गाडीवर हल्ला चढविला. 

दोघांनी गाडी अडविली व मागून फोडली काच 

मालेगाव बाजूकडे येणारा रोडवर स्पीड ब्रेकर जवळ त्यांनी त्यांची गाडी हळू केली असता मागून एका दुचाकीवरून धारधार हत्यारांसह अज्ञात साधारण 25 ते 30 वयोगटातील तीन जण येऊन तू आम्हाला कट मारला अशी कुरापत काढत त्यांना शिविगाळ करत दोघांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर पाठीमागून आलेल्या अन्य दुचाकीस्वारांनी त्यांच्या गाडीची काच फोडत गाडीतील रोख रक्कम पंचवीस लाख रुपये घेऊन पोबारा केला. 

पोलिसात गुन्हा दाखल 

अचानक घडलेल्या घटनेने व्यापारी मुथा हे घाबरले होते. या घटनेबाबत मुथा यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तर या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT