संदीप भोसले
लातूर : लातूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. एकामागून एक अशा खुनाच्या घटना घडत असल्याने लातूर पोलिसांचा धाक संपला कि काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. याच दरम्यान पैशांच्या देवाणघेवाणीतून शहरात एका तरुणाचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
लातूर शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. कोणत्या ना कोणत्या शुल्लक कारणावरून हाणामारी, खुनाच्या घटना घडल्या आहेत. यातच नववर्षात म्हणजे २०२५ या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात आतापर्यंत अकरा खुनाच्या घटना लातूरमध्ये घडले आहेत. तर लातूर शहरासह जिल्ह्यात देखील खुनाचे सत्र सुरूच आहे. यामुळे लातूरमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
पैसे काढून घेतल्याचा राग
दरम्यान आज पुन्हा एकदा शहरातील राजस्थान विद्यालयाच्या शेजारी एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील मयत हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. मयत अक्षय तेलंगे याच्यावर तडीपाराची देखील कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान झोपेत असताना आरोपी भुऱ्या अंकुशे (वय २७) याच्या खिशातील १ हजार १०० रुपये मयताने काढून घेतल्याचा राग होता.
मारेकरी पोलिसांच्या ताब्यात
खिशातून पैसे काढून घेतल्याचा राग मनात धरून झोपेत असताना दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान संशयित आरोपी भुऱ्या यास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याने अधिकचा तपास पोलीस करत आहेत. मात्र खुनाच्या घटनेने लातूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.