Nashik municipal election controversy hours before voting : मतदानाला काही तास शिल्लक असतानाच नाशिकमधील एकनाथ शिंदेंच्या उमेदवावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. विरोधात प्रचार करतो म्हणून शिंदेंच्या उमेदवाराने एका व्यक्तीचे अपहरण केल्याचा आरोप आहे. नाशिकसह राज्यातील २९ महापालिकेसाठी आज मतदान होत आहे. अनेकठिकाणी पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले. त्यातच आता अपहरणाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकचे राजकीय वातावरण तापलेय.
नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदेंच्या उमेदवाराविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार कमलेश बोडके यांच्यासह इतर ८ जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधात प्रचार करतो म्हणून फिर्यादी मनोज मुंडावरे यांचं घरातून नेत कारमध्ये अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी आज मतदान सुरू झाले आहे. ७३५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. नाशिक शहरात एकूण १५६३ मतदान केंद्रांवर मतदारांचा कौल समजणार आहे. २६६ मतदान केंद्रे संवेदनशील व अतिसंवेदनशील; विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १३ लाख ६० हजार ७२२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ६ लाख ५६ हजार ६७५ महिला मतदार तर ७ लाख ३ हजार ९६८ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
नाशिकच्या मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्या घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. प्राभाग क्रमांक २१ मध्ये इस्लाम पार्टीची कार्यकर्ता शरीफ मन्सूरी हा नागरीकांना स्लीपा वाटपाचे काम करीत असताना त्याच्यावर एमआयएमच्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. संवेदनशिल असलेल्या या भागात उद्या मतदान शांततेत पार पडेल का? पोलिस हल्लेखोरांवर काय कारवाई करणार असल्याचा प्रश्न इस्लाम पार्टींचे माजी आमदार आसिफ शेख यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.