Nashik Leopard Attack Dog ANI Tweeter
महाराष्ट्र

VIDEO: अंगणात बसलेल्या कुत्र्याला बिबट्याने नेलं फरफटत; थरार सीसीटीव्हीत कैद

अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली

वृत्तसंस्था

नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील एका वस्तीमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. मध्यरात्री वस्तीत शिरलेल्या एका बिबट्याने कुत्र्यावर अचानक हल्ला (Leopard Attack) चढवला. ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. एएनआय या वृत्तसंस्थेनं या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला असून आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लोकांना हा व्हिडिओ बघितला आहे. (Nashik Leopard Attack Dog Viral Video)

व्हिडिओमध्ये काय आहे?

33 सेकंदाचा या व्हायरल व्हिडिओत रात्रीच्या वेळी एक पाळीव कुत्रा अंगणातील कठड्यावर बसलेला दिसत आहेत. काही सेकंदात एक बिबट्या दबा धरून तिथे येतो. या बिबट्याला पाहताच कुत्रा जोरात भुंकतो आणि पळण्याचा प्रयत्न करतो. यावेळी बिबट्या काही वेळासाठी मागे जातो आणि कुत्रा अंगणात येताच त्याच्यावर हल्ला करतो. काही वेळाने बिबट्या कुत्र्याची शिकार करुन त्याला जबड्यात पकडून पळून जाताना दिसत आहे.

दरम्यान, या संपूर्ण थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच. नाशिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सध्या या बिबट्याचा शोध सुरू असून या घटनेनंतर नागरिकांनी मध्यरात्री घराबाहेर पडू नये असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

SCROLL FOR NEXT