Influencer attacked in Nashik News  Saam TV News
महाराष्ट्र

Nashik Crime : धक्कादायक! नाशिकमध्ये रिल्सस्टारला मारण्याचा कट, ८ लाख फॉलोअर्स पाहून नियत फिरली अन्...

Nashik Instagram ID theft : आठ लाख फॉलोअर्स असलेल्या इन्स्टाग्राम आयडीसाठी नाशिकमध्ये १७ वर्षीय रिल्सस्टारवर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोघांना वाचवले, तर तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Namdeo Kumbhar

Influencer attacked in Nashik News : लाखो फॉलोवर्स चोरण्यासाठी नाशिकमध्ये रिल्सस्टारच्या हत्येचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रिल्सस्टारचे इन्स्टाग्रामवर दोन आयडी मिळून आठ लाख फॉलोअर्स आहेत. त्यामुळे आरोपींनी रिल्सस्टारचा इन्स्टा आयडी मागितला. मात्र, त्याने आयडी देण्यास नकार दिल्याने तिघांनी त्याच्यासह मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स विक्री करून संशयितांचा पैसे कमावण्याचा प्रयत्न होता. तसेच स्वतःचे फॉलोअर्स वाढवून त्यानंतर पैसे कमावण्यासाठीही संशयितांनी कट रचल्याचे समोर येतंय. यावेळी पोलीस वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

इन्स्टाग्रामवर आठ लाख फॉलोअर्स असलेल्या १७ वर्षीय सौरभ सुनील मौर्या याच्या आयडी हस्तगत करण्यासाठी तिघांनी चॉपरचा धाक दाखवत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कन्नमवार पुलाखाली घडला. सुदैवाने गस्तीवरील भद्रकाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तिघा संशयितांना ताब्यात घेतले, तर दोन पीडित अल्पवयीन मुलांची सुटका केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शुक्रवारी (दि. ३०) रात्री भद्रकाली पोलीस ठाण्याचे बीट मार्शल संतोष आव्हाड आणि अझरुद्दीन इनामदार गोदावरी नदीकाठच्या कन्नमवार पुलाजवळ गस्त घालत होते. त्यावेळी पुलाखाली पाच मुलांचा आरडाओरड ऐकू आली. एका मुलाच्या गळ्यावर धारदार चॉपर लावलेले पोलिसांना दिसताच त्यांनी तत्काळ कारवाई केली. संशयित फरीद मन्सुरी (१९) याच्यासह दोन विधिसंघर्षित मुलांना ताब्यात घेण्यात आले. पीडित सौरभ मौर्या आणि त्याचा मित्र साहिल शेख यांना सुरक्षितपणे पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभच्या इन्स्टाग्राम आयडीवर आठ लाख फॉलोअर्स आहेत. संशयितांनी त्याचा आयडी हस्तगत करून फॉलोअर्स विक्रीद्वारे पैसे कमावण्याचा कट रचला होता. सौरभने आयडी देण्यास नकार दिल्याने त्याच्यासह साहिलवर हल्ला झाला. प्राथमिक तपासात संशयितांचा स्वतःचे फॉलोअर्स वाढवून नंतर पैसे कमावण्याचा हेतूही उघड झाला. फरीद मन्सुरी याला शनिवारी (दि. ३१) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, तर दोन विधिसंघर्षित मुलांना निरीक्षण गृहात पाठवण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT