
Commercial LPG Cylinder Price Cu t: जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्व सामान्यांना गुड न्यूज मिळाली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात केली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात २४ रूपयांनी कपात (OMCs reduced commercial LPG cylinder prices by ₹24) झाली आहे, नवे दर आजपासून लागू होणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात अथवा वाढ करण्यात आलेली नाही. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून थोडासा दिलासा मिळाला आहे.
तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात केली आहे. नवे दर आजपासून (१ जून) लागू झाले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) नुसार, दिल्लीत १९ किलोग्रॅमचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता १,७२३.५० रुपये (पूर्वी १,७४७.५० रुपये), कोलकात्यात १,८२६ रुपये (पूर्वी १,८५१.५० रुपये), मुंबईत १,६७४.५० रुपये (पूर्वी १,६९९ रुपये) आणि चेन्नईत १,८८१ रुपये (पूर्वी १,९०६ रुपये) मध्ये उपलब्ध असेल. या कपातीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांना दिलासा मिळाला आहे.
घरगुती सिलेंडरच्या किमती स्थिर (No change in domestic LPG rates )
तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत बदल केले आहेत. पण घरगुती १४.२ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही. दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर ८५३ रुपये, कोलकात्यात ८७९ रुपये, मुंबईत ८५२.५० रुपये आणि चेन्नईत ८६८.५० रुपये किमतीत उपलब्ध आहे. यापूर्वी ८ एप्रिल २०२५ रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली होती.
एलपीजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरवल्या जातात. जागतिक कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतार आणि इतर आर्थिक घटकांच्या आधारावर गॅसच्या किंमतीत बदल केला जतो. व्यावसायिक एलपीजीच्या दरांमध्ये वारंवार बदल होत असताना, घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजीच्या किमती स्थिर आहेत.
विमान कंपन्यांनाही दिलासा
एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपातीसह, तेल विपणन कंपन्यांनी एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या किमतीतही २,४१४.२५ रुपये प्रति किलोलीटरची कपात केली आहे. या नव्या दर आजपासून लागू झाले आहेत. गेल्या महिन्यातही ATF च्या किमतीत ३,९५४.३८ रुपये प्रति किलोलीटरची कपात झाली होती. यामुळे सुट्ट्यांच्या हंगामात विमान प्रवासाचे भाडे कमी होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.