Crime Saam tv
महाराष्ट्र

Crime: चारित्र्यावर संशय अन् नवऱ्याची सटकली, गर्भवती पत्नीचा गळा आवळला; नाशिक हादरलं

Husband Arrested for Killing Wife: चारित्र्याच्या संशयावरून पतीनं १९ वर्षीय गर्भवती पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी आरोपी पतीला अटक झाली आहे.

Bhagyashree Kamble

चारित्र्याच्या संशयावरून पतीनं १९ वर्षीय गर्भवती पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून पतीनं पत्नी हरवली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, पोलीस तपासात पतीचे बिंग फुटले. ही संतापजनक घटना नाशिकमध्ये घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अमृताकुमार आणि आरोपी पती विकीरॉय हे सातपूर परिसरात राहतात. पती बिगारी कामगार आहे. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. नवऱ्याची आर्थिक बाजू सक्षम नसल्यामुळे आणि महिला गरोदर असल्यामुळे ती आपल्या वडिलांकडून पैसे आणायची. या गोष्टीवरून त्यांच्यात कायम वाद व्हायचा.

२८ फेब्रवारीच्या आधी त्याने पत्नीला गंगापूर रोडलगत असलेल्या शहीद अरुण चित्ते पुलाजवळ नेत तिचा गळा आवळला. ज्यात पत्नीनं तिथेच प्राण सोडले. प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून नवऱ्यानं पोलीस ठाण्यात जात पत्नी हरवली असल्याची तक्रार दाखल केली होती. गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमासमोरील नदीपात्रालगत झाडाझुडपात मंगळवारी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.

नाशिक तालुका पोलिसांनी मृतदेहाचे फोटो शहर आणि ग्रामीण पोलिसांना पाठवले. त्यामुळे वर्णन पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद असलेल्या महिलेशी जुळले. मृतदेहावरील कपडे आणि टॅटू पाहून मृतदेह पत्नीचा असल्याचं पतीनं सांगितलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली असल्याचं कबूल केलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT