Nashik Girish Mahajan Speech Controversy Video Saam Tv
महाराष्ट्र

Girish Mahajan : भाषणात आंबेडकरांचं नाव घेतलं नाही, महिला पोलिस अधिकारी संतापली; थेट गिरीश महाजनांना जाब विचारला, VIDEO चर्चेत

Nashik Girish Mahajan Speech Controversy Video : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने वाद निर्माण झाला. महिला पोलिस अधिकाऱ्याने थेट जाब विचारला असून व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ

  • बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने महिला पोलिसांचा जाब

  • ‘सस्पेंड केलं तरी माफी मागणार नाही’ असा ठाम पवित्रा

  • पालकमंत्र्यांकडून खुलासा व दिलगिरी, मात्र वाद कायम

Woman Police Officer Madhavi Jadhav Questions Minister Nashik संपूर्ण देशभरात आज ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सकाळी ठिकठिकाणी ध्वजारोहन करण्यात आले. महत्त्वाच्या काही ठिकाणी अनेक मंत्री, पालकमंत्री यांनी ध्वजारोहन, भाषण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. दरम्यान, नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. पालकमंत्री गिरीश महाजनांच्या भाषणादरम्यान मोठा गोंधळ उडाला. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने एका महिला पोलिसांनी महाजनांना जाब विचारला आहे. त्यानंतर त्या महिला पोलीस अधिकारीने सस्पेंड केलं तरी माफी मागणार नाही असे म्हटले आहे. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये आज प्रजसत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केलं. त्यानंतर त्यांनी भाषण देखील केलं. या भाषणा दरम्यान एका महिला अधिकाराने गोंधळ घातला आणि महाजन यांना तुम्ही भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का नाही घेतला? असा जबाब विचारला. शिवाय पालकमंत्र्यांनी खूप मोठी चूक केली आहे. आपल्याला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही, असा पवित्रा संबंधित महिला पोलिसानं घेतला होता. माधवी जाधव असं या महिला पोलीस अधिकारीचं नाव असून त्या वन विभागात कार्यरत आहेत.

बाचाबाची झाल्यानंतर भूमिका मांडताना माधवी जाधव म्हणाल्या की, गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. ज्या व्यक्तीचं संविधानात मोठं योगदान आहे. याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे. मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. अशा त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना जाधव म्हणाल्या, "मला मीडियाशी देणं घेणं नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन. माती काम करेन. पण मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं असेल तर करू शकता. बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. मी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या तारखांना मानत नाही. पण लोकशाही मानते. मॅडम तुम्ही देखील संविधानामुळे आहात. पालकमंत्री देखील संविधानामुळे आहेत." दरम्यान लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही," असा सवालही माधवी जाधव यांनी विचारला.

माधवी जाधव यांनी केलेल्या प्रश्नावर बोलताना पालकमंत्री महाजन म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वगळण्यामागे कोणताही चुकीचा हेतू नव्हता. अनावधानाने राहिले असेल. मात्र मुद्दाम नाव डावलले नाही. मागील भाषण बघा कधीही असे झालेले नाही; परंतु कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. असे महाजन म्हणाले. दरम्यान या हा वाद वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking! वजन कमी करण्याचा प्रयोग ठरला जीवघेणा; यूट्यूबवर पाहिलेल्या औषधामुळे 19 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू

Kalyan : दबावामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मृत्यू झाल्याचा आरोप; कल्याण पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Boat Accident: मोठी बातमी! ३५० प्रवाशांना घेऊन जाणारं जहाज समुद्रात बुडालं; १५ जणांचा मृत्यू, २८ बेपत्ता

जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरार! बैठक सुरू असतानाच दोन प्रॉपर्टी डीलरची गोळ्या झाडून हत्या

Backless Blouse: बॅकलेस ब्लाऊजच्या स्टायलिश डिझाईन्स, हे आहेत 5 लेटेस्ट ट्रेडिंग पॅटर्न

SCROLL FOR NEXT