Bjp leader Rakesh Kosti  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा गँगवॉर! भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, परिसरात उडाली एकच खळबळ

Latest Crime News: धार्मिक शहराची ओळख असलेल्या नाशिकमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकंवर काढण्यास सुरुवात केली आहे.

Priya More

तबरेज शेख, नाशिक

Nashik News: नाशिकमध्ये पुन्हा गँगवॉर (Nashik Gang War) झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी भरवस्तीत भाजपच्या नेत्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारामध्ये भाजप नेता गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) सराईत गुन्हेगार जया दिवेला ताब्यात घेतलं आहे.

नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. धार्मिक शहराची ओळख असलेल्या नाशिकमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकंवर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशामध्ये नाशिकच्या अंबड परिसरातील दत्त चौकात रविवारी सकाळी गोळीबाराची घटना घडली. भाजपचे माथाडी कामगार शहराध्यक्ष राकेश कोष्टी यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये राकेश कोष्टी गंभीर जखमी झाले आहेत.

गोळीबाराची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. जखमी झालेल्या राकेश कोष्टी यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राकेश यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. राकेश कोष्टी यांच्यावर गोळीबार झाल्याचे कळताच नाशिकमधील भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

राकेश कोष्टी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी दुचाकीवरुन पळ काढला. आरोपी रस्त्यावरील सीसीटीव्हीत कैद झाले. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित असलेला सराईत गुन्हेगार जया दिवे याला ताब्यात घेतले आहे. महत्वाचे म्हणजे जया दिवे हा 4 दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. जया दिवे याने पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT