Nashik Onion Issue saam tv
महाराष्ट्र

Nashik Onion Market: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव पुन्हा बंद

Nashik Online Market Closed: आज पासून नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत व्यापा-यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.

Gangappa Pujari

अजय सोनवणे, प्रतिनिधी

Nashik Onion Market News:

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांच्या मागण्या व समस्यांवर जिल्हाधिका-यांच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आज पासून नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत व्यापा-यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपुर्वी केंद्र सरकारने कांद्याचे दर वाढत असतांना निर्यात मुल्यात ४० टक्के वाढ केली होती. या निर्णयानंतर नाशिक जिल्ह्यात (Nashik) अनेक संघटनांनी बंद पुकारला त्याला अप्रत्यक्षपणे व्यापाऱ्यांनी साथ दिली होती.

त्यानंतर केंद्र सरकारने नाफेडच्या (NAFED) मार्फत २४२० रुपये कांदा खरेदीची घोषणा केली. बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु होत नाही तोच पुन्हा व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बंद पुकारला आहे.

काय आहेत मागण्या?

कांद्याचे निर्यातमूल्य तत्काळ रद्द करावे, नाफेड व एनसीसीएफ मार्फत कांद्याची खरेदी मार्केट मध्ये करुन त्याची विक्री रेशनमार्फत करावी, केंद्र व राज्य शासनाला कांद्याचे भाव नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापारावर सरसकट पाच टक्के सबसिडी व देशातर्गत वाहतूकीवर सरसकट ५० टक्के सबसिडी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी हा बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.

व्यापाऱ्यांच्या या बंदमुळे सणाच्या काळात मात्र शेतक-यांकडे शिल्लक असलेला कांदा मात्र चाळीतच पडून राहणार आहे. दरम्यान दोन दिवसात या प्रश्नावर पुन्हा व्यापा-यांची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतात, याकडे शेतक-यांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत

Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

Saturday Horoscope : 7 नोव्हेंबरला ग्रहांची मोठी चाल! मेष ते मीन, कोणाचं नशीब चमकणार? वाचा आजचे राशिभविष्य

गोकुळचा तिढा आणखी वाढणार? शासननियुक्त सदस्यांचा वाद कोर्टात जाणार?

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट; वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT