nashik news
nashik news  saam tv
महाराष्ट्र

Ganesh Chaturthi 2022 : नाशिकमधील शेतकऱ्याची कमाल! कांद्यापासून तयार केली श्रीगणेशाची प्रतिकृती

अभिजीत सोनावणे

Nashik News In Marathi : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्वाच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. अनेक जण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहे. याचदरम्यान, नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शेतकऱ्याच्या गणरायाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या शेतकऱ्याने चक्क कांद्यापासून गणेशाची प्रतिकृती केली आहे. या शेतकऱ्याच्या गणेशाच्या प्रतिकृतीची चर्चा सर्वत्र राज्यभर सुरू झाली आहे.

विद्येची व ६४ कलांची देवता म्हणजे श्री गणेश. अनेक वस्तूपासून गणेशाची वेगळेगळी रुप आपण पाहिली आहेत. मात्र, निफाड तालुक्यातील शेतकरी संजय साठे यांनी चक्क कांद्यापासून प्रतिकृती तयार केली आहे.

शेतकरी संजय साठे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा गणपती बाप्पाजवळ मांडण्यासाठी चक्क कांद्यापासून श्रीगणेशाची प्रतिकृती बनवली आहे. आज मोठ्या उत्साहात गणरायाचं महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आगमन होत आहे, असे या मंगलमय प्रसंगी प्रत्येक जण सुखदु:ख विसरून गणरायाची आपल्या घरात करत असतो.

महाराष्ट्र अनेक समस्या असून सर्वात मोठी समस्या शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटत नाही. कोरडा दुष्काळ. ओला दुष्काळ. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज कांद्यापासून तयार केलेल्या गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली आहे.

दरम्यान, कांदा नगदी पीक मानला जात असल्याने नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक वेळा कांद्याच्या पिकाचे नुकसान होते. अतिवृष्टीमुळे कांद्यासहित कांदा रोप आणि कांदा पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. अतिवृष्टीमुळे एका एकरात निघत असलेल्या कांद्याचे उत्पादनही घसरते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. यामुळे शेतकरी संजय साठे यांनी कांद्यापासून गणरायाची प्रतिकृती करत आपले दु:ख विघ्नहर्त्याकडे मांडले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Kitchen Hacks : उन्हाळ्यात स्वयंपाक घरात हैराण झालात? या टिप्सच्या मदतीने राहिल किचनमध्ये थंडावा

Today's Marathi News Live: इंडिया आघाडीत डब्बे नाही, प्रत्येकाला इंजिन बनायचं आहे; देवेंद्र फडणवीस

Health Tips: टॉमेटो खा अन् स्वस्थ राहा, जाणून घ्या फायदे

Viral Video: अरेरे! 'नवी कोरी' कार घेतली; पठ्ठ्याने दारात आणण्याआधीच वाट लावली.. थरारक VIDEO

Sanjay Raut: बारामतीत महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई... सासवडच्या सभेत संजय राऊतांचे धडाकेबाज भाषण; PM मोदी, अजित पवारांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT