Latur Ganeshotsav: लातूरात धुमधडाक्यात गणरायाचं आगमन, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष

१ हजार ४०० गणेश मंडळांची आज गणरायाची प्रतिष्ठापना
Latur Ganeshotsav
Latur Ganeshotsav

लातूर - जिल्ह्यात गणरायाचं मोठ्या धुमधडाक्यात आगमण होत आहे. सकाळ पासुनच लातूर (Latur) शहरासह जिल्ह्यातील गणेश मंडळ आणि घरगुती गणपती खरेदी करताना मोठी गर्दी बाजारात दिसत आहेत. यासोबतच सजावटीचे साहित्य आणि पुजेचे साहित्य खरेदीसाठी ही गणेश भक्तांनी बाजारात गर्दी केली आहे. ढोलताशांचा गजरात लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. अनेक ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

हे देखील पाहा -

कोरोना महामारिमुळे दोन वर्षानंतर प्रथमच सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेश स्थापना होत असून यावर्शी हा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी पोलीस प्रशासनही सज्य झाले असून आत्तापर्यंत १ हजार ४०० गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर ४२८ गावांनी एक गाव एक गणपतीचा निर्णय घेतला आहे. श्रींच्या प्रतिष्ठापणेच्या दिवशी वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी आणि कोणतेही अनुचित घटना घडू नये म्हणून बाजारात मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Latur Ganeshotsav
Karan Johar Angry : 'या' स्टार किडवर रागावला करण जोहर, थांबवले चित्रपटाचे शूटिंग

गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी लाडक्या गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन होत आहे.सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज आज विराजमान होतील. त्यामुळे आता पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट, आरत्यांचे स्वर, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे. ठिकठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना व सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com