Viral Video: अरेरे! 'नवी कोरी' कार घेतली; पठ्ठ्याने दारात आणण्याआधीच वाट लावली.. थरारक VIDEO

New Car Accident Viral Video: सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नव्या कोऱ्या गाडीचे अपघातानेच स्वागत झाल्याचे दिसत आहे.
New Car Accident Viral Video:
New Car Accident Viral Video: Saamtv

स्वतःची चारचाकी गाडी असावी, असं प्रत्येकाचे स्वप्न असत. आपल्या स्वप्नातली ड्रीम कार घेण्यासाठी प्रत्येकजण जीवतोड मेहनत करत असतात. आपली हक्काची गाडी दारात आल्यानंतर त्याला जीवापाड जपत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नव्या कोऱ्या गाडीचे अपघातानेच स्वागत झाल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या अपघातांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधील काही अपघात इतके भयंकर असतात की पाहणाऱ्याच्याही काळजाचा ठोका चुकतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारने थेट दुचाकींना धडक दिल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे अपघात झालेली कारही नवी आहे. शोरुमधून घेऊन घरी नेण्याआधीच या गाडीचा अपघात झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.अनेकजण गाडीच्या मालकाची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

New Car Accident Viral Video:
Raigad Lok Sabha: रायगडमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का; महायुतीची ताकद वाढली

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवी कोरी, चमचमीत, हार घातलेली सुंदर गाडी बिल्डिंगच्या गेटवरुन आत येत असल्याचे दिसत आहे. अचानक गाडी आत येत असतानाच चालकाचे नियंत्रण सुटते अन् गाडी थेट पार्किंग केलेल्या दुचाकींच्या गर्दीत शिरते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना चालकाची चांगलीच खिल्ली उडवल्याचे दिसत आहे.

New Car Accident Viral Video:
Ahmednagar Lok Sabha: ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, भर चौकात झळकले बॅनर्स; राजकीय वर्तुळात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com