Nashik Earthquake Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Earthquake: नाशिक भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरले, एकाच दिवसातील दुसरी घटना; नागरिक भीतीच्या छायेत

Nashik Earthquake Update: नाशिक भूकंपाच्या धक्काने पुन्हा हादरले. एका दिवसात दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Priya More
  • नाशिकमध्ये एकाच दिवसात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के

  • पेठ तालुक्यातील चार गावांना भूकंपाचे सौम्य धक्के

  • नाशिक जिल्ह्यात ८ दिवसांत तिसऱ्यांदा भूकंप

  • नाशिकमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती

अभिजीत सोनवणे, नाशिक

नाशिक जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. एका दिवसलात सलग दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या तालुक्यातील ४ गावांना भूकंपाचे हादरे बसले त्यामुळे नागरिकांनी घाबरून तात्काळ घराबाहेर धाव घेतली.

नाशिक जिल्ह्यामध्ये आठ दिवसांत तिसऱ्यांचा भूकंपाचे धक्के जाणवले. आज पेठ तालुक्यातील गोंदे, बोरवट, देवगाव, भयगाव याठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दुपारी ४.५३ मिनिटांनी हे धक्के जाणवले. भूकंपाचे सौम्य धक्के असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही अशी माहिती प्रशासनाने दिली. आज पहाटे देखील जिल्ह्यातील सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते.

आज सकाळी नाशिक जिल्ह्यातल्या कळवम तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मध्यरात्री १२ वाजून ०६ मिनिटांनी सर्व जण झोपेत असताना भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे गावकरी घाबरले आणि घराबाहेर पळाले. आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरुळ आणि अंबापूर या परिसरात हे धक्के जाणवले असून नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी कोणतिही जीवितहानी झाली नाही. भूकंपाच्या धक्क्यानंतर वीज पुरवठा देखील खंडीत करण्यात आला होता. या भूकंपाचे केंद्रबिंदू निर्घुडपाडा हे होते.

याआधी, ८ ऑगस्ट रोजी याच परिसरात भूकंपाचे हादरे जाणवले होते. त्यानंतर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून नागरिकांना पुन्हा भूकंपाच्या धक्क्याला सामोरे जावे लागू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर आज रात्री झालेल्या भूकंपाने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचं पुन्हा ऑपरेशन टायगर, ठाकरे गटाचे 14 आमदार फुटणार?

Maharashtra News Live Update: डाॅल्बी बाबतच्या नियमांचे पालन करा; राज्यमंत्री योगेश कदम यांचे अहवान

Maharashtra Village : भारतातील रहस्यमयी गाव! जेथे घरांना, दुकानांना दरवाजे अन् कुलूप नाही

Video Viral : ना मोठी टीम, ना सरकारी मदत... २० वर्षाच्या एकट्या पोराने नदी केली स्वच्छ

Vidhyanand Bapat: घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...; विद्यानंद बापटांची मराठी सोप्या भाषेत घ्या समजून

SCROLL FOR NEXT