Nashik IT engineer harasses wife for Mercedes  Saam TV News
महाराष्ट्र

Nashik : मर्सिडीजसाठी २५ लाख आण, IT इंजिनियर पतीकडून डॉक्टर पत्नीचा छळ

Nashik Dowry harassment case : नाशिकमध्ये आयटी इंजिनिअर नवऱ्याने डॉक्टर पत्नीचा मर्सिडीजसाठी मानसिक व शारीरिक छळ केला. माहेरून २५ लाखांची मागणी करत हुंड्याच्या नावाखाली अत्याचार केल्याचा आरोप. गुन्हा दाखल, तपास सुरू.

Namdeo Kumbhar

तबरेज शेख, नाशिक प्रतिनिधी

Nashik IT engineer harasses wife for Mercedes : वैष्णवी हागवणे या हुंडाबळी प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे. पुण्यातील या प्रकरणानंतर आता राज्यभरातील इतर हुंड्याची प्रकरणं समोर येत आहेत. नाशिकमध्ये लागोपाठ दोन दिवस अशी दोन प्रकरण समोर आली आहे. भक्ती गुजराती प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली होती. त्यातच आता आणखी एक हुंड्याचे प्रकरण समोर आले आहे. आयटी इंजिनियर नवऱ्याने मर्सिडीजसाठी बायकोचा छळ केल्याचं उघड झाले आहे.

नाशिकमधील आयटी इंजिनियर पतीने डॉक्टर पत्नीचा पैशासाठी छळ केला. मर्सिडीज कार घेण्यासाठी माहेरकडून २५ लाखांची मागणी त्याने केली होती. त्यासाठी त्याने वारंवार पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे समोर आलेय. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून याचा गांभीर्याने तपास करण्यात येत आहे.

सध्या महिला हुंडाबळी आणि महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढत असताना नाशिकमध्ये पुन्हा एकदा एक महिला अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. मर्सिडीज कारची मागणी करत माहेरून २५ लाख रुपये आणण्यासाठी स्नेहल घुले या डॉक्टर पत्नीचा आयटी इंजिनिअर पतीकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी महिलेचा पती, सासू- सासरे आणि दीर- नणंद यांच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rose Sharbat : घरच्या घरी बनवा फ्रेश गुलाब सरबत, वाचा रेसिपी

Tilache Ladoo : हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा रेसिपी

Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Actress Assault: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर घृणास्पद कृत्य; दुःख व्यक्त करत म्हणाली, मला जीवन संपवावं...

SCROLL FOR NEXT