दसऱ्याच्या दिवशी नाशिक येथील गोरेवाडी परिसरात एका युवकाची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरात खळबळ उडाली. मागच्या काही महिन्यांपासून शहरात खुनांच्या घटना या नित्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न ऐरणीवर आला तर आहे. मात्र, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील नागरिक संतप्त झालेय.
नागरिकांच्या गाड्या फोडणे, चौकात गोळीबार करणे. गाडीचा कट लागला म्हणून थेट त्याची हत्या करणे आणि विशेष म्हणजे यामध्ये सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवकच असल्याने या सगळ्याला कुठेतरी राजकीय पाठबळ मिळते आहे का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.
अशातच दसरा या दिवशी झालेल्या घटनेसंदर्भात आता अधिकची माहिती समोर आली आहे. दसरा या सणाच्या दिवशी दांडिया खेळून घराकडे येत असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून भाजीविक्रेता असलेल्या कृष्णा दीपक ठाकरे (24) या तरूणावर सपासप वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. कृष्णाला बहिणीदेखत अंधारात नेऊन सपासप वार करण्यात आले.
शहरात खुनाच्या घटना थांबायचे नाव घेत नसून गेल्या नऊ महिन्यात 35 हून अधिक खून झाल्याने नाशिककर भीतीच्या सावट खाली जगत आहे. जाधववाडी येथे मोईन मकसुद शेख(21), प्रकाश उर्फ अशुभ आनंद बारसे (19, रा.डायमंड रो हाऊस गोरेवाडी) आणि दोन अल्पवयीन मुले तेथे आले. मोईन शेखने कृष्णाला हे भांडण मिटवून घेऊ असे म्हणत कृष्णाला बाजूलाच असलेल्या संजय जाधव यांच्या घरामागे घेऊन गेले. आणि तेथे अंधारात नेले.
बहिणीसमोरच केले सपासप वार
कृष्णाच्या बहीण ज्योतीने मोईन याच्या हातात चाकू असल्याचे पाहिले होते. त्यामुळे ती घाबरली होती. काय आहे ते इथेच बोला. कृष्णा बाजूला येणार नाही असे बोलली देखील मात्र कृष्णा गोड बोलून अंधारात नेऊन त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. त्यावेळी ज्योतीने भावाला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु तिची हाक कोणाच्या कानी पडली नाही आणि कृष्णा रक्ताच्या थारोळ्यात पडला. नंतर त्याला उपचारासाठी हलविण्यात आले, परंतु त्याचा जीव हा गेलेला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.