दांडिया कार्यक्रमात आमदाराचा राडा! स्टेजवर थिरकत असताना तरूणाच्या कानाखाली वाजवली, VIDEO व्हायरल

Gopal mandal slaps youth: नेहमीच वादग्रस्त ठरणारे जेडीयूचे आमदार गोपाळ मंडल त्यांच्या एका कृतीमुळे पुन्हा वादात सापडले आहेत. त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Gopal mandal slaps youth
Gopal mandal slaps youthSaam
Published On
Summary
  • दांडिया कार्यक्रमात आमदाराचा राडा.

  • तरूणाच्या कानशिलात लगावली.

  • आमदाराच्या नातेवाईकांनी आरोप फेटाळले.

नेहमीच वादग्रस्त ठरणारे जेडीयूचे आमदार गोपाळ मंडल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दांडिया कार्यक्रमात थिरकत असताना गोपाळ यांनी एका तरूणाला कानशिलात लगावली. आमदार गोपाळ हे स्टेजवर थिरकत होते. यावेळी एक तरूण त्यांच्या मागे नाचू लागला. त्या तरूणाच्या वारंवार येण्याने आमदार चिडले. यामुळे संतापलेल्या आमदारानं मागे वळून तरूणाच्या कानशिलात लगावली. यामुळे स्टेजवर काहीवेळ शांतता पसरली आहे.

ही घटना भागलपूरच्या झिरोमाईल परिसरात घडली आहे. शनिवारी २७ सप्टेंबर रोजी गोपाळ मंडल यांच्या मुलाच्या बिग डॅडी रेस्टॉरंटमध्ये दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार स्वत: उपस्थित होते. तसेच स्टेजवर गाण्यावर थिरकतही होते.

Gopal mandal slaps youth
'तटकरेंसारख्या xxx..' महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; शिंदे गटाच्या आमदाराची दादांच्या खासदारावर जहरी टीका

यावेळी, एक तरूण आमदारांच्या मागे येऊन वारंवार नाचू लागला होता. यामुळे संतापलेल्या आमदारांनी अचानक वळून पाहिला. नंतर तरूणाला जोरदार चापट मारली. या घटनेनंतर स्टेजवर काहीकाळ शांतता पसरली होती. आमदाराचे समर्थक आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने शांत केले. त्यानंतर आमदार कार्यक्रमातून निघून गेले.

Gopal mandal slaps youth
आधी बायकोला संपवलं, नंतर नवऱ्यानं आयुष्याचा दोर कापला; मित्राला VIDEO पाठवत म्हणाला.. इंजिनिअर कपलचा दुर्देवी अंत

ही घटना रविवारी २८ सप्टेंबर रोजी सोशल मीडियाद्वारे तुफान व्हायरल झाली. या व्हिडिओत ते स्पष्टपणे तरूणाला मारहाण करताना दिसून येत आहे. मात्र, या घटनेबाबत विचारणा करण्यासाठी आमदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या एका नातेवाईकाने, कोणताही शारीरित हल्ला झाल्याचे स्पष्टपणे नाकारले. दांडिया नृत्यादरम्यान, एका तरूणानं मागून नाचायला सुरूवात केली. आमदारांनी फक्त मागे हटण्यास सांगितले. मारहाणीची कोणतीच घटना घडली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com