तबरेज शेख
नाशिक : बुरा न मानो होळी है, हैप्पी होली असे म्हणत एकमेकांना शुभेच्छा देत एकमेकांना रंग लावले जातात. मात्र याच दिवशी नाशिकमध्ये भयानक घटना घडली आहे. हैप्पी होळी म्हणत एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिल्याची घटना नाशिकच्या ठक्कर बाजार बसस्थानकात घडली. यात सफाई कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
नाशिक शहरातील ठक्कर बाजार बसस्थानकात वाल्मिकी मेहतर संस्थेचे सुलभ शौचालय आहे. याठिकाणी विजय इलमचंद गहेलोत (वय ५४) हा सफाई कर्मचारी म्हणून कामावर होता. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता येथे नियमित येणारा संशयित शुभम जगताप हा शौचालयात आला. त्याला सफाई कर्मचारी गेहलोत यांनी हटकले असता संशयिताने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.
दारूच्या नशेत असलेल्या शुभम जगताप याला गेहलोत याने हटकल्याचा राग आल्याने त्याने हे भयानक कृत्य केले. पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने वाल्मिकी हा जोरजोरात आरोड्या मारायला लागला व आग विझविण्यासाठी प्रयत्न करू लागला. शुक्रवारी रात्री ठक्कर बाजार बस स्थानकात घडलेल्या या घटनेने बसस्थानक आवारात खळबळ उडाली होती. काहींनी वाल्मिकी याच्या कपड्याना लागलेली आग विझविली. यानंतर गंभीर जखमी अवस्थेत कर्मचाऱ्याला सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. होते.
उपचारादरम्यान अखेर मृत्यू
पेट्रोल मुळे कपड्याना लागलेली आग विझविण्यात थोडा उशीर झाल्याने सदर सफाई कर्मचारी ६० टक्के भाजला गेला होता. यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्यावर उपचार सुरु असताना आज त्याचा मृत्यु झाला आहे. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.