Lonavala Police : ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी नऊ लाखांची चोरी; चोरट्याला लातूरमधून अटक

maval News : जुगार खेळण्याचा नाद लागल्याने अनेकजण यात कर्जबाजारी झाले आहेत. काहींनी यातून टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. तर काहीजण चोरी करून हरलेली रक्कम परतफेड करत असतात
Lonavala Police
Lonavala PoliceSaam tv
Published On

मावळ : ऑनलाइन जुगाराच्या नशेत तरुण कोणत्या थराला जाऊ शकतात याचे धक्कादायक उदाहरण लोणावळ्यात समोर आले आहे. एका तरुणाने ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी तब्बल आठ लाख ७८ हजार रुपयांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला असता चोरी करणाऱ्या चोरट्याला लातूरमधून अटक करण्यात आली आहे. 

जुगार खेळण्याचा नाद लागल्याने अनेकजण यात कर्जबाजारी झाले आहेत. काहींनी यातून टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. तर काहीजण चोरी करून हरलेली रक्कम परतफेड करत असतात. अशाच प्रकारे लोणावळा मधील एका तरुणाने जुगाराच्या नादात चोरीचा मार्ग पत्करला. यातून त्याने तब्बल ८ लाख ७८ हजार रुपयांची चोरी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

Lonavala Police
Sangli Crime : बनावट ग्राहकाची जन्मतारीख ऐकताच भोंदूबाबा म्हणाला..अघोरी पूजा मांडताच झाला भांडाफोड

लोणावळा व पुणे ग्रामीण पोलीसांकडून शोध 

दरम्यान ९ मार्च रोजी कुसगाव येथील एका मार्केटमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर लोणावळा ग्रामीण पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला असता चोरटा लातूर येथे असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांचे एक पथक लातूरकडे रवाना झाले होते. 

Lonavala Police
Ahilyanagar Crime : स्विमिंग पुलाच्या चेंजिंग रूममधून आरटीओ अधिकाऱ्याची सोनसाखळी चोरी; चार तासातच पोलिसांकडून पर्दाफाश

लातूर जिल्ह्यातून चोरट्याला घेतले ताब्यात 

यानंतर पोलिसांनी लातूर जिल्ह्यातील बाबळगाव शेलु येथे लपून बसलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सचिन मोहन भोईने असे त्या चोरी प्रकरणी अटक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान लोणावळ्यातील कुसगाव येथील धनश्री सुपर मार्केट येथे चोरी केली होती. याची कबुली सचिन याने दिली असून पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com