Nashik News Saamtv
महाराष्ट्र

Nashik Crime: एकाच रात्रीत २ घरफोड्या! ८ तोळे सोने लांबवले; सिन्नर तालुक्यात खळबळ...

यात दोन ठिकाणी घरातील सदस्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून दोन महिला जखमी झाल्या आहेत.

अभिजीत सोनावणे

Nashik Crime News: सिन्नर (Sinner) तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिन्नोडच्या दोडी आणि दापूर येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्याच्या घटना घडल्या. यात दोन ठिकाणी घरातील सदस्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून दोन महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दोडी-दापूर रस्त्यावर दापूर शिवारात काकड मळा येथील छबू हरी आव्हाड यांचे घराचा दरवाजा उघडून मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास तिघा चोरट्यांनी प्रवेश केला. आव्हाड यांचा मुलगा सुनील व त्याची पत्नी सविता हे दोघे झोपलेल्या खोलीत चोरट्यांनी मोर्चा वळवला.

हातातील लोखंडी वस्तूंनी या दोघांना चोरट्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी पत्नी सविता हिच्या अंगावरील आणि घरातील सुमारे पाच ते सहा तोळे सोन्याचे दागिने तसच घरातील पाच हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. या मारहाणीत सुनील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने नांदूर शिंगोटे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. (Nashik Crime)

घरफोडीचा दुसरा प्रकार दोडी दापूर रस्त्यावरील दोडी शिवारात भारत बन्सी सदगीर यांच्या वस्तीवर घडला. चोरट्यांनी दरवाज्याची आतून लावलेली कडी उघडत प्रवेश केला. यावेळी ताई भारत सदगीर यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील दोन ते अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हस्तगत केले. त्यांना देखील नांदूरशिंगोटे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT