Nashik Crime News 
महाराष्ट्र

Nashik : भररस्त्यात नग्न झाला, महिलेकडे पाहून अश्लील चाळे, रिक्षा चालकाचा धक्कादायक प्रकार

Nashik Crime News : नाशिकमध्ये रिक्षाचालकाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भररस्त्यात त्याने महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई नाका पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत.

Namdeo Kumbhar

तरबेज शेख

Nashik Latest News Update : नाशिक शहरात एका रिक्षाचालकाने भररस्त्यात नग्न होऊन अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संशयित रिक्षाचालक मिजान रजा ऊर्फ मल्ला सादिक शेख याला अटक केली आहे. संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आलेय. यापूर्वी त्याला शहरातून तडीपार करण्यात आले होते. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तातडीने कारवाई केली.

महिलेची वाट अडवून अश्लील कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना नाशिकमधील मुंबई नाका परिसरात घडली. पीडित महिला बसमधून उतरल्यानंतर आरोपी रिक्षाचालकाने वाट अडवली. त्याने नग्न होऊन अश्लील हावभाव करत विनयभंग केला. यावेळी महिलेला मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बसचालक आणि वाहकाला आरोपीने मारहाण केली. एवढेच नव्हे, तर त्याने बसवर दगडफेक करून वाहनाचे नुकसानही केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

आरोपी अट्टल गुन्हेगार -

संशयित आरोपी मिजान रजा हा अट्टल गुन्हेगार आहे. नाशिकमध्ये घडलेल्या दंगली आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिजान याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या. मुंबई नाका पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला. त्याच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT