Nashik Police Saam tv
महाराष्ट्र

Nashik Police : नाशिकमध्ये एमडी ड्रग्स जप्त; रेल्वे स्टेशन परिसरात कारवाई, दाम्पत्य ताब्यात

Nashik News : नाशिक रोड परिसरात यापूर्वी देखील पोलिसांनी घरातून एमडी ड्रग्स विरोधात कारवाई केली आहे. यानंतर पुन्हा एकदा नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात एमडी ड्रग्स असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : राज्यातील अनेक शहरांमध्ये एमडी ड्रग्स प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. नाशिकमध्ये यापूर्वी देखील कारवाई झाल्यानंतर नाशिकमध्ये पुन्हा ३ लाख ८० हजार रुपयांचे एमडी ड्रग्स पोलिसांनी जप्त केले आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांनी सदरची कारवाई करत दाम्पत्याला अटक केली आहे.

नाशिक रोड परिसरात यापूर्वी देखील पोलिसांनी घरातून एमडी ड्रग्स विरोधात कारवाई केली आहे. यानंतर पुन्हा एकदा नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात एमडी ड्रग्स असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत ड्रग्स जप्त करून विक्रीच्या अनुषंगाने बाळगून ठेवलेल्या एका दाम्पत्याला अटक केली आहे. नाशिकमध्ये पुन्हा एकदा ड्रग्स आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

३ लाख ८० हजाराचे ड्रग्स जप्त

दरम्यान पोलिसांनी अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी आणि शबाना अन्सारी या दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. अन्सारी दाम्पत्य हे मूळ मालेगावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या दांपत्याकडून सुमारे ३ लाख ८० हजार रुपये किंमतीचा एमडी ड्रग्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

दाम्पत्यावर पोलिसात गुन्हा दाखल 
सदरची कारवाई केल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अन्सारी दाम्पत्याने सदरचा एमडी ड्रग्स कुठून आणले आणि कुठे विक्री केली जाणार होती, याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे. मात्र नाशिकमध्ये पुन्हा एकदा एमडी ड्रग्स आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

SCROLL FOR NEXT