Dharur Police : धारूर तालुक्यात अफूची शेती उध्वस्त; ५० गोण्या अफू पोलिसांकडून जप्त

Beed news : नशेखोरांकडून नशा करण्यासाठी अफूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे याची छुप्या पद्धतीने लागवड करत त्याची वाहतूक करून विक्री करण्यात येते. दरम्यान अफू पीकवण्यावर शासनाने निर्बंध घातले
Dharur Police
Dharur PoliceSaam tv
Published On

योगेश काशीद 
बीड
: अफू, गांजा लागवड करण्यावर बंदी करण्यात आली आहे. असे असताना देखील अनेकजण छुप्या पद्धतीने अफूची शेती करत असल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारे बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात अफूची शेती करण्यात आली होती. हि शेती पोलिसांनी कारवाई करत उध्वस्त केली असून कारवाईत पोलिसांकडून साधारण ५० गोण्या अफू जप्त करण्यात आला आहे. 

नशेखोरांकडून नशा करण्यासाठी अफूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे याची छुप्या पद्धतीने लागवड करत त्याची वाहतूक करून विक्री देखील करण्यात येत असते. दरम्यान अफू पीकवण्यावर शासनाने निर्बंध घातले आहेत. असे असताना देखील चोरून लपून अफू लागवड करत त्याची विक्री करण्यात येत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. बीड जिल्ह्यात देखील अफूची शेती केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Dharur Police
Tur Price : शेतकरी संकटात; तुरीच्या दरात तीन हजारांची घसरण, हरभऱ्यांचे दर ४०० रुपयांनी खाली

तीन गुंठे क्षेत्रात लागवड 

बीडच्या धारूर तालुक्यातील पिंपळवाडा येथे रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने चक्क बालाघाट पर्वतरांगेतील तीन गुंठे क्षेत्रावर शेततळ्याच्या पाण्यावर अफूची शेती पिकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकत कारवाई केली आहे. 

Dharur Police
SSC Exam : पेपर सुरु होण्यापूर्वीच इंग्रजीची प्रश्नपत्रिकाच पळवली; धारूर केंद्रावरील प्रकरणात दोघेजण ताब्यात

५० गोण्या अफू जप्त 
अफूच्या शेतीबाबत माहिती मिळताच बीड एलसीबी आणि धारूर पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे. या कारवाईत शेतातील अफू उपटून घेत साधारण ५० गोण्या अफू जप्त केला. दरम्यान शेतकरी रामहरी तिडके हा गायब झाला आहे. या प्रकरणी धारूर पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com