Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : नातेवाईकांच्या लग्नात जाण्यावरून पती- पत्नीतील वाद टोकाला; पत्नीची हत्या करत परी फरार

Nashik News : नातेवाईकांकडे असलेल्या लग्न सोहळ्याला पत्नी गेली नाही. याचा राग आल्याने पतीने पत्नीला विचारणा केली. यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला वादात नवऱ्याने कोयत्याने वार करून हत्या केली

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नातेवाईकांकडे लग्न असल्याने त्या लग्न सोहळ्याला पत्नीने जावे असे पटीने सांगितले. मात्र नातेवाईकांच्या लग्नात ने गेल्याच्या कारणावरून पती- पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. दोघांमधील हा वाद इतका टोकाला गेला कि, पतीने पत्नीच्या मानेवर शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या घटनेनंतर पती फरार झाला आहे. 

नाशिकच्या सातपूर परिसरात राजवाडा येथे महिलेचा खुन झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. सिंधूबाई पीठे (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. नातेवाईकांकडे असलेल्या लग्न सोहळ्याला पत्नी गेली नाही. याचा राग आल्याने पतीने पत्नीला विचारणा केली. यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यातूनच रागाच्या भरात पटीने पतीच्या गळ्यावर वार करत हत्या केली आहे.  

रात्री कामावरून आलेल्या मुलगा आईला बघून हादरला 

दरम्यान  सिंधूबाई यांचा मुलगा रात्री पावणे बारा वाजता कामाहून घरी आला. यावेळी त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली दिसून आली. आईची अवस्था बघून मुलाने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरीक मदतीला धावून आले. सिंधूबाईला बघितले असता तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने सिंधूबाईचा जागीच मृत्यू झाला होता. 

फरार पतीविरुद्ध गुन्हा दाखल 

घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस त्वरित घटनास्थळी येत पंचनामा केला. पोलिसांनी माहिती घेतली असता पती- पत्नी वादात नवऱ्याने कोयत्याने वार करून सिंधूबाईची हत्या केल्याची माहिती मृत महिलेच्या मुलांनी दिली आहे. तर पत्नीची हत्या करून पती फरार झाला आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात पती विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नालावडे यांच्या मार्गदर्शन खाली सातपूर गुन्हे शोध पथक करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

तुम्हीही प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय? तर आत्ताच व्हा सावध! शरीरावर होऊ शकतात ५ गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

आमदार विकून मुख्यमंत्रिपद दिलं अन् त्याला लोकशाही म्हणता?; कपिल सिब्बल भडकले,आयोगाची कोंडी, युक्तिवादाचा शब्द ना शब्द

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन! शाळांना सुट्टी जाहीर, कार्यक्रम रद्द; राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT