Nashik : नाशिकमध्ये दुचाकी चोरीची परप्रांतीय टोळी सक्रिय; चोरीच्या ९ दुचाकींसह दोघे ताब्यात

Nashik News : नाशिक शहरातील इंदिरानगर पोलिस हद्दीत दुचाकी चोरी झाली होती. या चोरीचा तपास करताना गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे राजीवनगर भागात सापळा रचून दोघा संशयितांना अटक करण्यात आली
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

तबरेज शेख 
नाशिक
: मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दुचाकी चोरी करणारी परप्रांतीय टोळी सक्रिय झाली असून यातील दोन जणांना पोलिसांनी सापळा रचत ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेल्या ९ दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 

नाशिक शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतीत दुचाकी चोरी झाली होती. या चोरीचा तपास करताना गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राजीवनगर भागात सापळा रचून दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. करण शिंदे व  शामसुंदर गेडाम असे अटक केलेल्या संशयिताच नाव आहे. त्यांनी वेगवेगळ्या भागातून चोरलेल्या ९ दुचाकी जप्त केल्या आहेत. 

Nashik News
KDMC Hospital : केडीएमसी रुग्णालयात महिलेचे मृत्यू प्रकरण; डॉक्टरसह नर्स, रुग्णवाहिका चालकावर कारवाई

ताब्यात घेतलेले दोघे परप्रांतीय 

विशेष बाब म्हणजे हे दोघेही परप्रांतीय असून एक तेलंगणा तर दुसरा परभणीमधील राहणारा आहे. हे दोघे महागड्या दुचाकी चोरी करण्यासाठी नाशिकमध्ये यायचे. दुचाकी चोरी करून काही दिवस पसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. तर त्यांचे आणखी कोणी साथिदार आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत. 

Nashik News
IPL Betting : आयपीएलच्या सामन्यावर सट्टा; पोलिसांची छापेमारी, दोघांना अटक

दोघांवर पाच गुन्हे दाखल 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांकडून दहा लाख रुपये किमतीच्या ५ महागड्या दुचाकी सह एकूण ९ मोटर सायकल हस्तगत केल्या आहेत. या संशयीतांवर नाशिकच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहे. हे गुन्हे देखील उघडकीस आले असून अधिक तपास इंदिरानगर पोलीस करीत आहे. तसेच त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. 

पंढरपुरात दोन पिस्टलसह दोघांना अटक
एका जणाची गोळ्या घालून खून करण्याच्या तयारीत असलेल्या दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसींनी पकडले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि जीवंत काडतूस जप्त केली आहेत. पूर्वीच्या वादातून एकाची गोळ्या घालून हत्या करण्यासाठी दबा धरून बसलेल्या दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पंढरपूर शहरालगत असलेल्या जूना कासेगाव रोड परिसरात करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com