IPL Betting : आयपीएलच्या सामन्यावर सट्टा; पोलिसांची छापेमारी, दोघांना अटक

Jalgaon News : आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामने अंतिम टप्प्यावर आले असून आता रंगतदार मोडवर आहे. यात कोणता संघ जिंकेल, कोण किती रण करेल आणि कोण किती विकेट घेणार यावर जोरदार सट्टा चालविला जात आहे
IPL Betting
IPL BettingSaam tv
Published On

अमळनेर (जळगाव) : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या सामने सध्या सुरु असून या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टा खेळला जात आहे. अशाच प्रकरणे मोबाईलच्या माध्यमातून सट्टा खेळला जात असताना पोलिसांनी छापेमारी करत अमळनेरमध्ये कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडत त्यांचे मोबाईल ताब्यात घेतले आहेत. 

आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामने अंतिम टप्प्यावर आले असून आता रंगतदार मोडवर आहे. यात कोणता संघ जिंकेल, कोण किती रण करेल आणि कोण किती विकेट घेणार यावर जोरदार सट्टा चालविला जात आहे. काही सामने अखेरच्या बॉल पर्यंत जात असल्याने यावर सट्टा लावण्याचे प्रमाण अधिक आहे. असाच प्रकार जळगावच्या अमळनेर शहरात सुरु होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. 

IPL Betting
Solapur DCC Bank : सोलापूर जिल्हा बँकेवर प्रशासकाला मार्चपर्यंत मुदतवाढ; न्यायालयाच्या आदेशानंतर सहकार आयुक्तांचा निर्णय कायम

दरम्यान अमळनेर शहरातील बालाजी पुरा भागात प्रसाद पांडुरंग साळी हा मोबाईलवर आयपीएल सामान्यांसाठी लोकांकडून पैसे स्वीकारून सट्टा खेळत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिस पथकाने सायंकाळी पावणेसातला पथकाने छापा टाकला. यावेळी प्रसाद साळी हा आयपीएल सामन्यावर सट्टा खेळताना आढळून आला. 

IPL Betting
KDMC Hospital : केडीएमसी रुग्णालयात महिलेचे मृत्यू प्रकरण; डॉक्टरसह नर्स, रुग्णवाहिका चालकावर कारवाई

दोघेजण ताब्यात 

त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आकाश महेंद्र पवार (रा. वडचौक, अमळनेर) याच्या सांगण्यावरून आयपीएल सामन्यावर सट्टा खेळवत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा मोबाईल व ३१० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रसाद साळी व आकाश पवार यांच्याविरुद्ध मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आता कोणत्या सामन्यांवर किती रुपयांचा सट्टा खेळला? याचा शोध घेत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com