Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : दारु पिण्यास मागितले पैसे; कुटुंबीयांनी नकार दिल्याने राग अनावर, पेट्रोल टाकून राहते घरच पेटविले

Nashik News : दारूचे व्यसन लागल्यानंतर व्यसन पूर्ण करण्यासाठी वाट्टेल त्या थराला पोहचत असतात. नाशिकमध्ये अशाच प्रकारे दारू पिण्यासाठी पैसे न मिळाल्याने स्वतःच्या घराला आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: दारूचे व्यसन असल्याने रोज दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा प्रकार सुरु होता. यात दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता कुटुंबीयांनी पैसे देण्यास नकार दिला. पैसे न दिल्याच्या रागातून राहत्या घरावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या उत्तमनगर परिसरातील भगवती चौकात घडला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.   

नाशिक शहराच्या उत्तम नगर परिसरातील भगवती चौकात हा प्रकार घडला आहे. सुरेश काळे असं स्वतःचे घर पेटवून देणाऱ्या संशयीत व्यक्तीचे नाव आहे. सुरेश काळे हा त्यांच्या दुमजली घराच्या तळमजल्यावर संशयित एकटा राहतो. दरम्यान काल दुपारी त्याने वरच्या मजल्यावर जाऊन कुटुंबीयांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यास कुटुंबीयांनी नकार दिला. यात काही एक न बोलता रागाच्या भरात सुरेश निघून गेला. 

आग लावल्यावर घर बंद करून पसार 

खाली उतरून त्याने घरासमोर उभ्या असलेल्या एका दुचाकीमधून पेट्रोल काढून आणले. यानंतर त्याने तळमजल्यावरील घरात जाऊन पेट्रोल ओतून देत घर पेटविले. इतकेच नाही तर त्याने खोलीला बाहेरून कुलूप लावून पसार झाला होता. घरातून बाहेर धूर येत असल्याचे दिसून आल्याने धावपळ उडाली होती. कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच तातडीने पोलिस व अग्निशमन दलाला माहिती कळविली. 

काळे यास पोलिसांनी घेतले ताब्यात 

माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्राच्या जवानांनी धाव घेत तातडीने पाण्याचा मारा करत आग विझविली. तोपर्यंत घरातील संसारपयोगी वस्तू या आगीत बेचिराख झाल्या होत्या. याबाबत काळे यांचे नातेवाईक असलेले संतोष काळे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान याप्रकरणी अंबड पोलिसांनी सुरेश काळे याला अटक केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे मेट्रोची वाहतूक आता रात्री २ वाजेपर्यंत

Toxic Relationship: तुमच्यासोबतही 'या' गोष्टी घडतात का? मग तुम्हीही एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात

Russia-Ukraine War : दहशत आणि क्रूरतेचा कळस! रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच रात्रीत डागल्या ६२९ मिसाइल

Maharashtra Politics : महापालिका निवडणुकांसाठी दोन पक्षांची युती, एकत्र लढणार, पुढच्या बैठकीत ठरणार प्लान

Maharashtra Politics: गणपती दर्शनाआधी एकनाथ शिंदे–राज ठाकरे यांची बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा|VIDEO

SCROLL FOR NEXT