Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : मौजमजेसाठी सोनसाखळी, दुचाकी चोरी; टोळीसह सोनं खरेदी करणारा सराफ व्यावसायिकही ताब्यात

Nashik News : महागडे मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. दरम्यान पोलिसांनी या टोळीकडून ११ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: मौजमजा करण्यासाठी सोन साखळी आणि दुचाकी चोरी करण्यास सुरवात केली. चोरलेल्या दुचाकी व सोन्याच्या चैन विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून मौज केली जात होती. अशा प्रकारे चोरी करणाऱ्या या टोळीचा नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तसेच या टोळीकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन दिवसात तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आल्या होत्या. यानंतर गंगापूर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत सोन साखळी चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलासंह तिघांचा समावेश आहे.

नाशिकसह पुण्यातील चोरी उघडकीस 

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महागडे मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. दरम्यान पोलिसांनी या टोळीकडून ११ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये नाशिक शहरातील सात तर पुणे जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी आणि दुचाकी चोरी केल्याचे गुन्हा उघडकीस आले आहेत. 

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता 

एकूणच गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढ झाली होती. सोनसाखळी चोरांना पकडण्याचा मोठे आव्हान नाशिक पोलिसांसमोर होते. सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून अजून तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT