Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : भांड्याच्या दुकानात धाडसी चोरी; ३५ लाखांची तांब्या पितळाची भांडी चोरी गेल्याने खळबळ

Nashik News : गेल्या काही दिवसांपूर्वी एस. एस. मोबाईल दुकानाचे शटर तोडून दुकानातील लाखोंचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. या घटनेचा तपास लागलेला नसताना शेजारीच असलेल्या होलसेल भांड्यांच्या दुकानात चोरीची घटना

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
येवला (नाशिक)
: मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यानुसार नाशिकच्या येवला शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चोऱ्या होत असून यात चोरटयांनी आता आपला मोर्चा भांड्यांच्या दुकानांकडे वळविला आहे. येवला शहरातील बालाजी मेटल्स नावाने असलेल्या होलसेल विक्रेत्याच्या दुकानात धाडसी चोरीची घटना घडली आहे. यात चोरटयांनी ३० ते ३५ लाख रुपये किंमतीचे भांडे घेऊन चोरटे पसार झाले आहेत. 

नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात गेल्या अनेक दिवसांपासून भुरट्या चोरांनी नागरिक आधीच हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एस. एस. मोबाईल या दुकानाचे शटर तोडून दुकानातील लाखोंचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. या घटनेचा तपास अद्याप लागलेला नसताना शेजारीच असलेल्या बालाजी मेटल होलसेल भांड्यांच्या दुकानातून तांब्या पितळाची भांडी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. 

येवला शहरातील ओंकार पाकळे यांच्या बालाजी मेटल या होलसेल भांड्यांच्या दुकानाचे मागील बाजूचे शटर उचकावून दुकानातील तांब्या पितळाची तब्बल ३० ते ३५ लाख रुपयांची भांडी चोरून नेण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांसमोर चोरट्याना शोधण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले आहे,दरम्यान या प्रकरणी दुकान मालकाने शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत. 

वर्ध्यातून सव्वातीन लाखांचे मोबाईल लांबवीले 

वर्धा शहरात रात्रीच्या सुमारास मोबाईल विक्रीच्या दुकानाचे शटर तोडून जवळपास सव्वातीन लाख रुपयांचे मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. वर्धेच्या झेंडा चौकात ही घटना घडली असून दुकानाचे शटर तोडून नेल्याने इतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे परिसरात लागलेल्या सिसिटीव्हीत कैद झाले असून पोलीस शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

Ovache Pani Pinyache Fayde: 15 दिवस रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी प्या, वजन होईल झटपट कमी

SCROLL FOR NEXT