Hingoli : बस वाहकाची मुजोरी; एक रुपयासाठी प्रवाशाला मारहाण; हिंगोली पोलिसात गुन्हा

Hingoli News : लाल परीने प्रवास सुरू असताना हि मारहाणीची घटना घडली आहे. यात कळमनुरी न्यायालयात लिपिक असलेल्या उत्तम सखाराम लोंढे (वय ४६) याना बस वाहक व चालकाने मारहाण केल्याची तक्रार पोलिसात आहे
Hingoli News
Hingoli NewsSaam tv
Published On

हिंगोली : एसटीतून प्रवास सुरक्षित प्रवास म्हटले जाते. परंतु आता हा प्रवास सुरक्षित राहिला नसल्याचा अनुभव मागील काही दिवसात प्रवाशांना येत आहे. तसेच प्रवाशी हेच दैवत असे म्हणवणाऱ्या एसटीतील प्रवाशाला बस कंडक्टरकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तिकिटातील एक रुपया मागितल्याचा राग आल्याने प्रवाशाला मारहाण झाल्याची घटना हिंगोलीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

लाल परीने प्रवास सुरू असताना हि मारहाणीची घटना घडली आहे. यात कळमनुरी न्यायालयात लिपिक असलेल्या उत्तम सखाराम लोंढे (वय ४६) याना बस वाहक व चालकाने मारहाण केल्याची तक्रार पोलिसात आहे. दरम्यान उत्तम लोंढे हे हिंगोली येथे वास्तव्यास असून ते रोज ये- जा करत असतात. दरम्यान २६ मार्चला सायंकाळी ड्युटी संपल्याने घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी कळमनरी ते हिंगोली या बसमध्ये प्रवासासाठी बसले होते.  

Hingoli News
Ration Shop : रेशन दुकानात मिळणार बचत गटाची उत्पादने; धाराशिव जिल्ह्यातून पहिला उपक्रम

एक रुपया मागितल्याचा राग

कळमनरी ते हिंगोली बस प्रवास करत असताना उत्तम लोंढे यांनी बस टिकीट काढले. यात बस वाहक एस. बी. घुगे यांना दिलेल्या तिकिटाच्या रक्कमेतून एक रुपया शिल्लक राहिला होता. हा उरलेला एक रुपया लोंढे यांनी मागीतला असता वाहक घुगे व बस चालक या दोघांनी मिळून शिवीगाळ करुन, चापटाबुक्याने मारहाण करुन मुक्कामार दिला. तसेहच तुला बघुन घेतो असे म्हणुन धमकी दिली. 

Hingoli News
Dharashiv : मार्च अखेरीस केवळ ३४ टक्के पाणीसाठा; धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पातील स्थिती

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान घडलेल्या प्रकरणानंतर उत्तम लोंढे यांनी थेट हिंगोली शहर पोलीस स्टेशन गाठले. यानंतर घडल्या प्रकारची माहिती पोलिसांना देत बस वाहक घुगे व चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com