Mumbai–Nashik Expressway Saam TV
महाराष्ट्र

वाहनधारकांनो सावधान! मुंबई-नाशिक हायवेवर बंटी बबलीचा वावर; अशी करतात फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख, साम टिव्ही

Mumbai–Nashik Highway : सोशल मीडियावर 3 ते 4 दिवसांपासून एक व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पोलिस उपनिरीक्षक शेलार अणि अंमलदार मुंबईहून नाशिकला परतणाऱ्या टेम्पो व ट्रक चालकांना भिवंडी ते नाशिक (Nashik) दरम्यान होत असलेल्या लुटमारीची माहिती देत आहेत. SAAM TV ने याबाबत पोलिसांकडून (Police) माहिती घेतली असता, हा व्हिडीओ खरा असून लुटमारीच्या घटनांपासून वाहनचालकांचे प्रबोधन करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हायवेवर कट मारण्याच्या बहाण्याने एक मुलगा अणि त्याबरोबर असलेली मुलगी अंधाराचा फायदा घेत शेतकरी वर्ग तसेच इतर वाहनचालकांची लूट करण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे पोलिस जनजागृती म्हणून वाहन चालकांना माहिती देत आहे. नाशिकहून भाजीपाला घेऊन निघालेले वाहनचालक ठाण्यात भाजीपाला विक्री करून रोख पैसे घेऊन परततात. या वाहनचालकांवर बंटी-बबलीची जोडी पाळत ठेवून असते.

वाहनचालकांना ‘गाडीला कट का मारला’ अशी कुरापत काढून याच जोडीने वाहनधारकांना लुटण्याच्या तीन ते चार घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी हायवेवर गस्त वाढवली असून संशयास्पद जोडपे दिसताच गाडी न थांबवता पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबतचा व्हिडीओ चार पाच दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि नाशिक तसेच मुंबईतून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. भाजीपाला विकून घराकडे मार्गस्थ होणाऱ्या चालकांना तसेच मालवाहू वाहनांना टार्गेट करत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. त्यामुळे बाकी प्रवाशांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगावी आणि कुठलाही संशयित प्रकार दिसला तर पोलिसांचा 112 टोल फ्री नंबर वर संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे़.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT