Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News : ३ दिवसांपासून बेपत्ता, चिमुकल्याचा मृतदेह झुडपात सापडला; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा...,

7 year old boy killed after kidnapping in Chandwad : नाशिकमध्ये एका ७ वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली. हा मुलगा परप्रांतीय असल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

अजय सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिकमध्ये एका परप्रांतीय चिमुकल्याचा खून झाल्याची घटना घडली आहे. हा चिमुकला सात वर्षांचा होता. चांदवड तालुक्यात ही घटना घडल्याचं समोर येतंय. या चिमुकल्याचं अगोदर अपहरण झालं होतं, त्यानंतर त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळतेय. घटनेमुळे चांदवड तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.

तीन दिवसांपासून बेपत्ता

याबाबत सविस्तर वृत्त असं की, नाशिकच्या चांदवड तालूक्यातील वडनेर-भैरव येथे परप्रांतीय संतोष भागवत हा मोलमजूरी करण्यासाठी आलाय. या व्यक्तीचा ७ वर्षाचा मुलगा आहे. तो तीन दिवसांपासून बेपत्ता (Nashik Crime News) होता. त्यामुळे संतोष भागवत याने पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली होती. वडनेर-भैरव पोलीस ठाण्यात त्याने तक्रार नोंदवली होती.

पोलिसांत तक्रार नोंदवली

तीन दिवसापुर्वी एका अज्ञात तरुणाने मुलाचं अपहरण (kidnapping) केल्याचा संशय होता. मुलगा हरवल्याची तक्रार वडनेर-भैरव पोलिसात दाखल झाली असतांना पोलीस त्याचा शोध घेत होते. तेव्हा पोलिसांनी गावातील एका संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्याने मुलाचा खून (killed) करुन तो मराठी शाळेजवळ असलेल्या मोकळ्या जागेत फेकल्याची माहिती दिली.

मृतदेह सापडला

पोलिसांनी तेथे जात मृतदेह ताब्यात (crime news) घेतला. अर्पितकुमार संतोष भगत, असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. दरम्यान लहान मुलाला एका मंदीराजवळून आपल्या मागे येण्याचा अज्ञात तरुणाचा सीसीटीव्ही समोर आलाय. त्या आधारे पोलिसांनी श्वान पथकाद्रवारे शोध घेण्याचा प्रयत्न केला अखेर काल १७ ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह शाळेच्या मोकळ्या जागेत झुडपात (nashik news) सापडला. या घटनेमुळे वडनेर-भैरव गावात चांगलीच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT