Nashik Igatpuri School Teacher Physically Assault on 9 years Girl  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime : नाशिक हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवले, दमदाटी केली; ५५ वर्षीय शिक्षकाची ९ वर्षीय मुलीवर वाईट नजर पडली अन्...

Nashik Igatpuri Crime News : नाशिकच्या इगतपुरीमध्ये 9 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 55 वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • इगतपुरीत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा संतापजनक प्रकार उघड

  • 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा आरोप

  • पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी शिक्षक अटकेत

  • पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल, कठोर शिक्षेची मागणी

अभिजित सोनावणे, नाशिक

Nashik Igatpuri School Teacher Physically Assault on 9 years Girl शिक्षकांच्या हाती विद्यार्थ्यांचं भविष्य, सुरक्षितता आणि संस्कार असतात मात्र याच शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये ५५ वर्षीय शिक्षकाने खाऊचे आमिष दाखवून ९ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केले असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक-कारंजवाडी येथे घडली. रामचंद्र मनाजी कचरे (वय ५५) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, तो जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहे. चॉकलेटचे आमिष, भीती आणि दमदाटीचा वापर करून कचरे हा एका निष्पाप मुलीच्या बालपणावरच घाला घालण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी मुलीने आपल्या कुटुंबियांना घडलेली हकीकत सांगितली. पीडित मुलीच्या सांगण्यावरून तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर घोटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. शिवाय तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत आरोपीला अटक केली.

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुरेखा देवरे व तुषार ढगे तपास करीत असून, संशयिताविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी नराधम शिक्षकाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील तळजाई परिसरात २५ ते ३० गाड्यांची तोडफोड

यावर्षी किती लाख कोटींचे सामंजस्य करार होणार? थेट दावोसहून उदय सामंत EXCLUSIVE

Lung Cancer Symptoms: कोणतेही व्यसन नसतानाही फुफ्फुसांचा कॅन्सर होतो? आताच जाणून घ्या लक्षणं अन् डॉक्टरांचा इशारा

SSC Hall Ticket: कामाची बातमी! दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट जारी; कसं डाउनलोड करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Accident News : महामार्गावर ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक, भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT