Malegaon police arrest 55-year-old man for assaulting a 13-year-old mentally challenged girl. saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime: मालेगाव पुन्हा हादरलं! १३ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार, ५५ वर्षीय नराधमाला ठोकल्या बेड्या

Malegaon Mentally Challenged Minor Assaulted : मालेगाव शहर पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटनेनं हादरलंय. डोंगराळे येथील घटना ताजी असतानाच मालेगावमध्ये एका गतीमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलीय.

Bharat Jadhav

मालेगावमध्ये १३ वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय.

पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आलंय.

अजय सोनवणे, साम प्रतिनिधी

तीन वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच मालेगावमध्ये पुन्हा एक अत्याचाराची घटना घडलीय. एका ५५ वर्षीय व्यक्तीन गतीमंद असलेल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, ५५ वर्षीय व्यक्तीनं पीडित गतीमंद मुलीला आमिष दाखवत स्कूटीवर बसवून एका निर्जनस्थळी नेलं. तेथे त्याने मुलीवर अत्याचार केला. दिपक धनराज छाजेड, असा नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक करत आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

नुकतीच मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका तीन वर्षीय मुलीची अत्याचार करत हत्या करण्यात आलीय. या घटनेमुळे नागरिक संतप्त झालेत. आरोपीला फाशी द्या, अशी मागणी करत आहेत. त्यानंतर पुन्हा घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने मालेगाव हादरले आहे. अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असल्यानं शासनाने दोषींवर कठोर शिक्षा केली पाहिजे.

कठोर कायदा केला पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहेत. दरम्यान डोंगराळे येथे झालेल्या घटनेप्रकरणी एका २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. २० नोव्हेंबर रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाबाहेर नागरिकांना मोठी गर्दी केली होती. नागरिकांमधील निर्माण झालेला रोष पाहून आरोपीला न्यायालयात हजर करणं पोलिसांसाठी कठीण झालं होतं. दरम्यान सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं आपण मानसिक रुग्ण असल्याचा दावाही केला होता, पण पोलिसांनी आधीच केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये तो मानसिकदृष्ट्या फीट असल्याचं समोर आल्याची माहिती समोर आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: महिला वकिलानं बलात्कार केल्याचा पुरुषाचा आरोप, कुठं-कुठं नेलं? तक्रारीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Maharashtra Live News Update: रसायनी एमआयडीसीतील सुप्रिया केमिकल कंपनीत भीषण आग

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा भर सभेत थेट उदय सामंत यांना फोन, टाळ्यांचा कडकडाट, नेमके काय घडले? नंतर गडबड..., VIDEO

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूच्या जवळच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण आलं समोर

Grey Hair Tips: तरुणपणीच केस पांढरे होतायेत? आजीबाईंचा हा घरगुती उपाय करा, केस होतील काळेभोर आणि सिल्की

SCROLL FOR NEXT