नाशिक : देशभरातून येणाऱ्या भाविकांकडून रामकुंडावर कोरोना नियमांची सर्रासपणे पायमल्ली केली जात असल्याचं दिसून येत आहे. यावेळी ना मास्कचा वापर, ना सोशल डिस्टनसिंगचे पालन होताना दिसत आहे. प्रशासनाकडूनही परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र आहे (Nashik Corona Update violation of corona restrictions at Ramkund).
ओमिक्रॉन (Omicron) च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दिवसा जमावबंदी लागू आहे. मात्र, दुसरीकडे रामकुंड (Ramkund) आणि गोदाघाट परिसरात मात्र दररोज देशभरातून येणाऱ्या हजारो भाविकांची गर्दी होतेय. अनेक भाविक विनामास्क बिनधास्तपणे या ठिकाणी फिरत असल्याचं पाहायला मिळतंय. येथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होतांना दिसत नाहीये किंवा अन्य नियमांचं देखील पालन होत असल्यानं कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.
रामकुंडावर गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील दिलेत. मात्र, अद्याप त्यावर प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याने परिस्थिती जैसे थे तैसेचं आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.