Nashik Corona Restrictions: नाशकात एकीकडे जमावबंदी, दुसरीकडे रामकुंडावर भाविकांची गर्दी

नाशकात एकीकडे जमावबंदी आहे, तर दुसरीकडे रामकुंडावर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
Nashik Corona
Nashik CoronaSaam Tv
Published On

नाशिक : नाशकात एकीकडे जमावबंदी आहे, तर दुसरीकडे रामकुंडावर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. आज मकर संक्रांतीनिमित्त नाशिकच्या रामकुंडावर गोदावरी स्नानासाठी देशभरातील भाविकांनी मोठी गर्दी केलीये (Nashik corona update crowd of devotees on Ramkunda breach corona restrictions).

Nashik Corona
Nashik Corona Update: नाशकात कोरोनाचा उद्रेक सुरुच, 24 तासात 1,925 नवे रुग्ण

कोरोना (Corona) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एकीकडे जमावबंदी लागू आहे. मात्र, दुसरीकडे रामकुंडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. मकर संक्रांतीच्या पर्वकाळात गोदावरी, वरुणा आणि अरुणा असा तीन नद्यांचा त्रिवेणी संगम असलेल्या रामकुंडावर स्नानाला विशेष असं महत्व आहे.

Nashik Corona
Gondia Corona: नेत्यांच्या प्रचारसभा की कोरोनाचा हॉटस्पॉट, परवानगी 50 जणांची, गर्दी शेकडोंची

त्याचबरोबर आजच्या दिवशी संगमावर पूजा आणि दानाचेही विशेष महत्व मानलं जातं. त्यामुळे देशभरातून आलेल्या भाविकांची या ठिकाणी स्नान आणि पूजेसाठी मोठी गर्दी झाली असून रामकुंड आणि परिसरातील मंदिरं भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली आहेत. मात्र, या सर्वात भाविकांना कोरोना नियमांचा विसर पडला असून कोरोना नियम सर्रासपणे पायदळी तुडवले जात असल्याचं पाहायला मिळतंय.

नाशकात कोरोनाचा उद्रेक

नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 1,925 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. एकट्या नाशिक शहरात 1,368 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नाशिक (Nashik) ग्रामीणमध्ये 428, मालेगावात 47 तर जिल्हाबाह्य 82 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही आनंदाची बाब आहे. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत 7,824 सक्रिय कोरोना (Corona) रुग्ण आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com