Nashik Corona Update: नाशकात कोरोनाचा उद्रेक सुरुच, 24 तासात 1,925 नवे रुग्ण

एकट्या नाशिक शहरात 1,368 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
Nashik Corona Update
Nashik Corona UpdateSaam Tv

Nashik Corona Update: नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 1,925 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. एकट्या नाशिक शहरात 1,368 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे (Nashik Corona Update 1925 New Corona Cases Found In Last 24 hours).

Nashik Corona Update
Maharashtra Corona Update: राज्यात 46 हजार 406 नव्या रुग्णांची नोंद

तर, नाशिक (Nashik) ग्रामीणमध्ये 428, मालेगावात 47 तर जिल्हाबाह्य 82 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही आनंदाची बाब आहे. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत 7,824 सक्रिय कोरोना (Corona) रुग्ण आहेत.

Nashik Corona Update
Corona In India: देशात मे सारखा कोरोना विस्फोट? 10 दिवसांत रुग्णांच्या संख्येत 6 पटीने वाढ!

राज्यात 24 तासात 46 हजार नवे कोरोना रुग्ण

राज्यात गेल्या 24 तासात 46,406 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 70,81,067 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 34,658 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 66,83,769 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या 24 तासात 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,41,737 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे.

सध्या राज्यात 2,51,828 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 1,367 ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com