गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या प्रजारसभाच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहेत. नेत्यांच्या प्रचारसभेला 50 लोकांची परवानगी असताना शेकडोची गर्दी होत आहे. त्यामुळे नेते मंडळींच्या सभेतच कोरोना नियमांना हरताळ फासल्याचं दिसून येत आहे (Leaders campaign become the corona hotspot in Gondia).
गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी येत्या 18 जानेवारीला निवडणुका (Election) होणार आहेत. विविध पक्षांच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मात्र, राजकीय नेत्यांच्या प्रजारसभाच कोरोना हॉटस्पॉट (Corona Hotspot) ठरु लागल्या आहेत.
प्रशासनाकडून राजकीय सभेला 50 लोकांची परवानगी दिली असताना शेकडोची उपस्थिती सभेत होत आहे. कोरोना नियमांना हरताळ फासून कित्येकांच्या तोंडावर मास्क दिसून येत नाहीये. तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रचारसभेतून दिसून आले आहे. मात्र, अद्याप कुणावरही कारवाई करण्यात न आल्याने सामान्य नागरीकांवर कारवाई आणि राजकीय नेत्यांना अभयष दिला जात आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.