Nashik Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : मालेगावमध्ये राडा! लहान मुलांचा किरकोळ वाद; दोन गटाचा एकमेकांवर गोळीबार

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये गोळीबार झाला. मेहताब अली या तरुणाने दोन गोळ्या झाडल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

मालेगावात लहान मुलांच्या वादातून दोन गटात संघर्ष झाला

मेहताब अलीने पिस्तूलातून दोन गोळ्या झाडल्या

मात्र सुदैवाने कोणी जखमी नाही

घरात घुसून तोडफोड आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

आयेशानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक मधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. मालेगावमध्ये लहान मुलांच्या आपापसातल्या वादामुळे दोन गट आपापसात भिडले. या वादात गोळीबार झाल्याचेही माहिती मिळाली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मालेगाव मध्ये काही लहान मुलांचा आपापसात मोठा वाद झाला. या भांडणाच्या कारणावरून कुरापत काढत मेहताब अली या तरुणाने सुमारे १० ते १२ तरुणांना सोबत घेतले. मेहताबने दोन्ही हातात पिस्तूल घेऊन लईक अहमद मोहम्मद कामील यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या.

सुदैवाने लईक अहमद मोहम्मद कामील खाली बसल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला. यानंतर १० ते १२ संशयित आरोपींनी त्याला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. येवढ्यावरच न थांबता लईक याच्या घरात जबरदस्तीने घुसून घरातील वस्तूंची तोडफोड केली. यावेळी एका संशयितांने हातात दोन तलवारी घेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर घराबाहेर उभी असलेली मोटरसायकल पाडून नुकसान केलं.

या गोंधळात लईकचा मोबाईल व तब्बल ५०,००० रोख रक्कम गहाळ झाले. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी आयेशानगर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT