Ashok Kharat’s alleged black empire exposed as SIT uncovers massive 7400% rise in assets within seven years. 
महाराष्ट्र

अशोक खरातच्या संपत्तीत 7400 टक्क्यांची वाढ; 7 वर्षात कशी वाढली संपत्ती? फाईल्समधून धक्कादायक माहिती समोर

Captian Ashok Kharat Wealth : अशोक खरातनं ढोंगीपणा करत हजारो कोटींचं काळं साम्राज्य उभं केलं. मात्र 2017 मध्ये तोट्यात असलेल्या खरातच्या संस्थानाच्या संपत्तीत तब्बल 7 हजार 400 टक्क्यांची वाढ कशी झाली? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

वासनांध भोंदू अशोक खरातच्या एसआयटीनं मुसक्या आवळल्या. आणि खरातच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग फुटलं. तपासात एकेक धागा उलगडताना खरातच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा भांडाफोड झाला. नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात खरातच्या संपत्तीचं जाळं असल्याचं समोर आलं. मात्र आता खरातचा अध्यात्माच्या नावाखाली श्री शिवनिका संस्थानचा आधार घेत जो वासनांध धंदा सुरु होता. त्यातून हजारो कोटींची संपत्ती जमा केली. अवघ्या 7 वर्षात खरातच्या संपत्तीत तब्बल 7 हजार 400 टक्के वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मात्र ही वाढ कशी झालीय? पाहूयात.

वासनांध खरातच्या श्री शिवनिका संस्थानची 2017-18 मध्ये 4 लाख 67 हजार 609 रुपये इतकीच संपत्ती होती. त्यानंतर तीन वर्षांनी 2020-21 मध्ये याच खरातची संपत्ती 1 कोटी 54 लाख इतकी झाली. तर पुढे 2024-25 मध्ये खरातच्या संपत्तीनं नवा उच्चांक गाठत 2 कोटी 25 लाखांची संपत्ती असल्याचं जाहीर केलं. त्यात फक्त 2024 या एका वर्षात 76 लाख रुपयांची देणगी जमा झाल्याचं समोर आलं.. त्यामुळेच संशय बळावलाय.

खरं तर 2017 मध्ये खरातचं संस्थान तुटीत असल्याचं दाखवण्यात आलं होतं.. मात्र अवघ्या 7 वर्षात 7400 टक्क्यांनी खरातची संपत्ती वाढलीय..मात्र एखाद्या ज्योतिषशास्त्राच्या संस्थानाच्या मालकाची मालमत्ता तब्बल ७४ पटीनं वाढूच कशी शकतेय, असा सवाल विचारला जातोय. कारण सर्वसाधारण नोकरदार किंवा व्यावसायिकाची संपत्तीही दूरदूरवर एवढ्या पटीने वाढू शकत नाही.

खरं तर एखाद्या नोकरदाराचा पगार दरवर्षी 8-12 टक्क्यांनी वाढतो. यानुसार 7 वर्षात त्याची संपत्ती 84 टक्क्यांपर्यंतच वाढू शकते. तर एखाद्या व्यावसायिकानेही 100 टक्के नफा कमावला तरी त्याची संपत्ती 700 टक्क्यांपेक्षा जास्त वाढण्याची शक्यताच नाही. त्यामुळेच खरातच्या संपत्तीत तब्बल 7400 टक्क्यांनी झालेली वाढ ही चक्रावणारी आहे. ही संपत्ती राजकीय आणि प्रशासकीय लागेबांध्याशिवाय निर्माण होऊच शकत नाही . 2018 ते 2025 याच कालावधीत अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, उद्योगपतींचा खरातच्या दरबारी असलेला राबता हे च यामागचं कारण होत का. त्यामुळे आता खरातच्या सगळ्याच आर्थिक कनेक्शनचा आणि त्याला मदत करणाऱ्यांचा तपास तर व्हायलाच हवा पण केवळ खरात नव्हे तर खरातच्या आकांचाही बुरखा फाडायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT