Nashik Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: हृदयद्रावक! खेळता खेळता तलावात पडले, बहीण भावाचा करुण अंत; नाशिक हळहळलं

Nashik Breaking News: धनश्री भंडकर (वय, ४ वर्ष) आणि आयुष्य रवींद्र भंडकर (वय, ५ वर्ष) अशी या बहिण- भावांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक|ता. २ मे २०२४

नाशिकमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात सिन्नर तालुक्यातील रामनगरमध्ये लहान बहिण भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. धनश्री भंडकर (वय, ४ वर्ष) आणि आयुष्य रवींद्र भंडकर (वय, ५ वर्ष) अशी या बहिण- भावांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिन्नर तालुक्यातील रामनगरमध्ये धनश्री भंडकर आणि ५ वर्षाचा आयुष्य रवींद्र भंडकर या दोघा बहीण भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय दोन्ही मुलं घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या ५-६ फूट छोट्याशा पाण्याच्या तलावात पडल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

मुलं खेळता खेळता पाण्यात पडली हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. मात्र नंतर तलावाजवळ लहान मुलांचा आरडाओरडा ऐकल्यानंतर गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली असता दोन्ही बहिण भाऊ पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले.

दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने मुलांना पाण्यातून बाहेर काढत जवळच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने मुलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच संपूर्ण गावावर सध्या शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT