Apoorva Hire News Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: अद्वय हिरेंपाठोपाठ बंधू अपूर्व हिरेंच्याही अडचणी वाढल्या; नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Gangappa Pujari

तबरेज शेख, नाशिक| ता. २९ नोव्हेंबर २०२३

Nashik Political News:

नाशिकमधील उपनेते अद्वय हिरे यांच्या अटकेने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा बँकेत कर्ज घोटाळा केल्याप्रकरणी अद्वय हिरे सध्या अटकेत आहेत. अशातच अद्वय हिरे यांच्या पाठोपाठ त्यांचे बंधु अपूर्व हिरे यांच्यावरही फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचे बंधु अपूर्व हिरे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अद्वय हिरेंपाठोपाठ अपूर्वहिरेंंवरही गुन्हा दाखल झाल्याने हिरे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अपूर्व हिरे हे माजी आमदार असून सध्या ते राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत.

संस्थेत नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत १० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. उत्तम चौधरी यांच्या तक्रारीवरुन अपूर्व हिरे (Apurv Hire) यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्वय हिरेंपाठोपाठ त्यांच्या मोठ्या बंधूवरही गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, नाशिक जिल्हा बँकेत कर्ज घोटाळा केल्याप्रकरणी अद्वय हिरे (Advay Hire) यांना १५ नोव्हेंबरला भोपाळमधून ताब्यात घेण्यात आले होते. आठ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर मंगळवारी त्यांना जामीन मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने हिंरेचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT