Grief grips Rahud village in Nashik after a debt-ridden farmer died by suicide amid onion price crash and crop losses. saam tv
महाराष्ट्र

कृषिप्रधान देशाची शोकांतिका! कांद्याला कवडीमोल भाव; नाशिकमधील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Nashik Baglan Farmer Endlife Due To Onion Price Crash: नाशिकच्या बागलाण तालुक्यातील राहुड येथे कर्जबाजारीपणा, हवामान बदल आणि कांद्याला मिळालेल्या कवडीमोल दरांमुळे शेतकरी गुलाब निकम यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Omkar Sonawane

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिकच्या बागलाण तालुक्यातील राहुड येथे कर्जबाजारीपणा, बदलते हवामान आणि शेतीमालाला मिळणाऱ्या कवडीमोल दरांच्या विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. गुलाब केशव निकम (वय ५९) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या निधनाने राहुडसह काटवन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गुलाब निकम यांची स्वतःची सुमारे तीन एकर शेती कसून पत्नी व तीन मुलांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेतीच्या उत्पन्नावरच संसाराचा गाडा हाकणाऱ्या निकम यांच्यावर घरासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. त्यातच बदलत्या हवामानामुळे शेतीचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. यंदाच्या हंगामात त्यांनी कांदा पिकाची लागवड केली होती. मात्र परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला. उरलेला कांदा बाजारात विकला असता त्याला मातीमोल भाव मिळाल्याने त्यांची आर्थिक कोंडी आणखी तीव्र झाली होती.

नातेवाईकांकडून घेतलेले हातउसने पैसे कसे फेडायचे, घरखर्च कसा चालवायचा आणि तीन मुलांचे विवाह कसे उरकायचे, या चिंतेने ते सतत विवंचनेत राहत होते. वाढते कर्ज आणि अपुरे उत्पन्न यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, जनावरांना चारा टाकण्यासाठी ते काल गावाशेजारील खळ्यात गेले होते. रात्री ते शेतातच थांबले होते मात्र सकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने मुलगा चेतन निकम हा खळ्याकडे गेला असता वडिलांनी गळफास घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

हा प्रकार पाहताच त्याने आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येऊन राहुड गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

भेसळयुक्त दुधानंतर आता FDAच्या निशाण्यावर मिसब्रँडेड सौंदर्यप्रसाधने; 34.61 लाखांचा साठा जप्त

पंढरपुरात भीषण अपघात; भरधाव टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू

ठाकरेंच्या खासदाराच्या कारचा अपघात; ताफ्यातल्या गाड्या एकमेकांवर आदळल्या|VIDEO

Gold Rate : दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होणार; तज्ज्ञांचा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT