Shivnika Trust linked to Ashok Kharat faces scrutiny over rapid financial growth and alleged irregularities. 
महाराष्ट्र

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरातचा काळाचिठ्ठा बाहेर येणार, शिवनिका ट्रस्टचा सीए करणार पोलखोल

Ashok Kharat Women Exploitation Case: शिवनिका ट्रस्टच्या आर्थिक वाढीची चौकशी सुरू झाली आहे. अशोक खरात प्रकरण अधिक तीव्र झाले आहे. संशयास्पद व्यवहारांसंदर्भात अधिकारी सीएची चौकशी करू शकतात.

Bharat Jadhav

  • शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारांवर संशय

  • 4 लाखांवरून कोटींच्या उलाढालीपर्यंत झेप

  • सीए ललित पोफळे चौकशीच्या रडारवर

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केलेल्या अशोक खरात प्रकरणी आता नवनवे आरोप होत आहेत. खरातच्या या काळ्या कारनाम्यात अजून कोण आहे? त्याला राजकीय वरदान होतं का? इतकं मोठं साम्राज्य निर्माण केलं? त्याने नरबळी घेतलेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता मिळतील. पोलिसांच्या हाती अशोक खरातचा मोबाईल लागला असून त्यात राजकीय नेत्यांची नावे असल्याचं समोर आले आहे. आता याप्रकरणी अजून खरात सपूर्ण काळाचिठ्ठा बाहेर येणार आहे. कारण त्याचा नीकटवर्तीय व्यक्तीच संपूर्ण प्रकरणाची पोलखोल करणार आहे.

अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टच्या आर्थिक संशयास्पद व्यवहारांवर पोलिस तपास करत आहेय. 2018 मध्ये केवळ चार लाखांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टने 2024 पर्यंत कोटींच्या घरात झेप घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या ट्रस्टच्या माध्यमातून झालेले व्यवहार, संबंधित व्यक्ती आणि निधीचा स्त्रोत याचा सखोल तपास केला जाणार आहे. ट्रस्टचे संचालक म्हणून सीए ललित पोफळे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात असून, त्यांच्या चौकशीची शक्यता वर्तवली जात असताना एक नवी नाट्यमय घडामोड घडत असताना दिसत आहे.

भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, सीए ललित पोफळे यांनी स्वतःला वाचवण्यासाठी खरात यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनचा दरवाजा ठोठावल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या घडामोडींमुळे पीडीतांकडून संशय व्यक्त केला जात असून, पोफळे फिर्यादी झाल्यास त्यांना कायदेशीर संरक्षण मिळू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात यांच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये सीए ललित पोफळे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचा आरोप आहे. खरात याचे सुमारे 100 कोटी रुपये दुबईला पाठवण्यात पोफळे याचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, आतापर्यंत 300 कोटी रुपयांहून अधिक हवाला व्यवहार पोफळे यांच्या माध्यमातून झाल्याचीही चर्चा आहे. या प्रकरणात पोफळे यांचे भाऊ हर्षद प्रकाश पोफळे देखील पोलिसांच्या रडारवर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मोठ्या उद्योजकांना त्यांच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक अडचणींमधून बाहेर काढण्याच्या बहाण्याने पोफळे त्यांना विविध बुवा-बाबा आणि ज्योतिषांकडे घेऊन जात असत. या प्रक्रियेत क्लायंट्सची सविस्तर वैयक्तिक व आर्थिक माहिती आधीच गोळा करून ती अशोक खरात आणि इतर ज्योतिषांना पुरवली जात होती. त्यामुळे संबंधित ज्योतिषांना त्या व्यक्तींवर प्रभाव टाकणे सोपे होत असल्याचा आरोप आहे.

उद्योजकांच्या आर्थिक क्षमतेनुसार त्यांना वेगवेगळ्या व्यक्तीकडे नेले जात असल्याचेही समोर आले आहे. 1000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योजकांना बेंगळुरूतील लक्ष्मण महाराज, 500 कोटींपेक्षा जास्त असलेल्यांना अशोक खरात, तर 200 कोटींपेक्षा जास्त असलेल्यांना सुजित देशमुख महाराज यांच्याकडे नेण्यात येत होते. तसेच रघुनाथ येमूळ या ज्योतिषाकडेही अनेक क्लायंट्सना नेण्यात आले होते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अशोक खरात आणि त्यांच्याशी संबंधित सर्व ट्रस्टची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली आहे.एकीकडे चौकशीची प्रक्रिया वेग घेत असताना, दुसरीकडे पोफळे यांनी दाखल केलेल्या एफआयआरमुळे प्रकरणाला नवे राजकीय आणि कायदेशीर वळण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढे काय उलगडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराण-अमेरिका युद्धात दहशतवाद्यांची एन्ट्री, हुथी दहशतवादी करणार जगाची नाकेबंदी?

Maharashtra Live News Update: कुमशी ग्रामसभेत दगडफेक व मारहाण; तिघे गंभीर जखमी

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांना अटक होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

गडचिरोलीत थरारक अपघात! लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला; प्रवासी बस आणि कार एकमेकांवर आदळले, 5 जणांचा जागीच मृत्यू

Mhada Mumbai Lottery: मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण; 2640 सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर

SCROLL FOR NEXT