मोठी बातमी! रुपाली चाकणकरांना अटक होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Rupali Chakankar Under Sit Scanner In Kharat Case: खरात प्रकरणामुळे महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षपद गमावलेल्या रुपाली चाकणकारांच्या अडचणीत आता पुन्हा एकदा वाढ होणार आहे... प्रदेशाध्यपक्ष गेल्यानंतर आता थेट चाकणकरांवर अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... त्यामुळे खरातप्रकरणात पोलिसांच्या रडारवर कोण आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
SIT intensifies probe in the Kharat case as political links and Shivnika NGO operations come under scrutiny.
SIT intensifies probe in the Kharat case as political links and Shivnika NGO operations come under scrutiny.Saam Tv
Published On

अघोरी कृत्य, महिलांचं शोषण आणि भोंदूगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खरातच्या आर्थिक नाड्या आवळण्यास आता सुरुवात झालीय. खरातला पाठबळ देणाऱ्या राजकारण्यांचा शोध घेण्यासाठी SIT ने आता आपला मोर्चा 'शिवनिका' संस्थेकडे वळवलाय. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद गमावलेल्या चाकणकरांना खरात प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावल्याचीही माहिती सूत्रांनी दिलीय...त्यामुळे चाकणकरांसह खरात प्रकरणात SITच्या रडारवर कोण आहेत ? पाहूयात...

अशोक खरातने स्थापन केलेल्या 'शिवनिका' संस्थेच्या माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार आणि कार्यक्रम केले होते... या संस्थेवर कार्यरत सर्व आजी-माजी सदस्यांची आता एसआयटीकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. या सदस्यांना लवकरच चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार आहे. संस्थेच्या निधीचा वापर आणि खरातला मिळालेले पाठबळ यावर पोलीस लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे शिवनिकाच्या सदस्य असणाऱ्या रुपाली चाकणकरांचीही SIT कडून चौकशी होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली जातेय...

खरात प्रकरणावरून आधीच चाकणकरांना महिला आयोगाचं अध्य़क्षपद आणि नंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपद सोडावं लागलयं. खरातसोबत इतरही नेत्यांचे फोटो व्हायरल झालेत. खरातला पाठबळ देणाऱ्या आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांची चौकशी करून अटक करावी, अशी मागणी विरोधकांनी केलीय...

या गंभीर प्रकरणात बडे धेंडे असल्याने एसआयटी सखोल तपास करुन सत्य समोर आणणार का ? हाच खरा सवाल आहे. येत्या काही दिवसांत SIT कडून भोंदूबाबा अशोक खरातच्या 'शिवनिका' संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची धरपकड होण्याची शक्यता आहे. अशातच चाकणकर SIT चौकशीला सामोरे जाऊन आपली बाजू कशी मांडतात? आणखी कोणत्या नेत्यांचं, मंत्र्यांचं खरातसोबतचं कनेक्शन समोर येतं? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com